ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे - डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते जी चांगले आरोग्य, मनःशांती व जीवनाच्या विवेकज्ञानाकडे नेते.
ध्यान पध्दती.....

पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज् या सर्वांपर्यंत आनापानसति ध्यान, शाकाहार व पिरामिड शक्ति पोहोचविणे हे एकमेव ध्येय ठेवून काम करणार्या निधर्मी, कोणताही पंथ नसलेल्या, नफा न कमावणार्या स्वयंसेवी संस्था आहेत. पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज् मूव्हमेंट ही नवयुगातील जागतिक आध्यात्मिक क्रांतीचा भाग आहे. हिंसाचाराकडून अहिंसेकडे, मांसाहाराकडून शाकाहाराकडे आंधळ्या धार्मिक श्रध्देकडून शास्त्रीय प्रयोगशीलतेकडे व शास्त्रीय तर्काकडे मूढ, तर्कहीन, अजाण ऎहिकतेकडून, सुजाण समजूतदार आध्यात्मिकतेकडे घेऊन जाणारी ही चळवळ आहे !
पी.एस्.एस्.मूव्हमेंट विषयी.........
पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज् मूव्हमेंटचे संस्थापक ब्रह्मर्षि पत्रीजी यांनी त्यांच्या जीवनात सुरूवातीला स्वतःला आलेल्या सखोल अनुभवांमधून ध्यानाची खरी शक्ति ओळखली आणि १९७९ मध्ये आत्मज्ञान प्राप्त केले. तेव्हापासून जगातील सर्व लोकांना ध्यान व शाकाहार शिकविणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे हे आपले जीवन-ध्येय केले. त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे शास्त्रीय व धर्मातीत असून धार्मिक भावनांना आवाहन न करणारा आहे.
पुढे वाचा...

पिरामिड हे सर्वांगिण विकासाचे चिन्ह आहे. पिरामिडला चार बाजू असतात. ते चार जगत दर्शवितात- खनिज जगत, वनस्पति जगत, प्राणी जगत व मानवी जगत. पिरामिडच्या चारही बाजू जेथे एकत्र येतात तिथे ही सर्व एक होतात, हीच आध्यात्मिकता !
पुढे वाचा...
चौकशीसाठी (संपर्क) -
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
प्रतिक्रिया देण्यासाठी (संपर्क) -
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
"ध्यानाकरता केलेले दान सगळ्यात सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ व संभवनीय उत्तम दान आहे.-ब्रह्मर्षि पत्रीजी
नित्य अन्नदान सेवा देण्यासाठी/करण्यासाठी
पिरामिड व्हॅली इंटरनॅशनल, बेंगलुरु, भारत.
आध्यात्मिक जीवनासाठी शाकाहार अत्यंत आवश्यक आहे. खरे पहाता आध्यात्मिकता आणि शाकाहार हे समानार्थक शब्द आहेत.
प्रत्येकाने शाकाहारी व्हायला हवे.
पुढे वाचा...
"आपण एकदा ‘गुरू, मास्टर’ बनलो की जन्म-मरणाच्या साखळीतून सुटतो ! पृथ्वीवरील आपला विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण होतो. आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही तथापि, इतरांना शिकविण्यासाठी किंवा इतरांसमोर उदाहरण म्हणून होण्यासाठी आपण कदाचित अधूनमधून या पृथ्वीवर येऊ. मानवी अनुभव यशस्वीपणे पूर्ण केल्यावर आपल्याला उच्चतर जगात बढती मिळेल. आपण आपल्या सामान्य ‘स्व’ ची निर्मिती करायला सुरूवात करू. आपल्या वैयक्तिक ऊर्जाशक्तिच्या साठयानुसार आपण कदाचित नवीन जग, नवे ग्रह, नव्या आकाशगंगा सुध्दा निर्माण करू.
-ब्रह्मर्षि पत्रीजी