आनापानसति-उचितध्यान पद्धती

ध्यान करताना कुठल्याही मंत्राची नाही, तर निर्विचार होण्याची गरज आहे. कुठल्याही मंत्राचे उच्चारण नाही, कुठल्याही देव-देवतेची रूपधारणा नाही किंवा प्राणायामाची गरज नाही कारण कुठलाही मंत्र किंवा रुपधारणा ही मनात केली जाईल आणि आपल्याला आवश्यक ती निर्विचार स्थिती लवकर प्राप्त होणार नाही. आपल्याला आवश्यकता आहे ती फक्त दररोजच्या सरावाची. कमीत कमी जेवढी वर्ष आपले वय तेवढी मिनिटे रोज ध्यान करावे. उदाहरणार्थ एखाद्याचे वय २५ वर्षे असेल तर त्याने कमीतकमी २५ मिनिटे ध्यान करावे. ध्यानासाठी कुठलीही वेळ आणि कुठलेही ठिकाण योग्यच असते.

सुखासन

ज्या आसनात आरामात दीर्घ काळ बसू शकतो अशा कुठल्याही आसनात बसा. खुर्चीवर बसलात तरी चालेल, पायाची अढी घाला. डोळे बंद ठेवा. हाताची बोटे एकमेकांत गुंफा आणि आपल्या सहज संथ श्वासोच्छ्वासाकडे पहात शांत बसा. विचार सोडून द्या. जर विचारांसोबत भटकलात तर परत श्वासावर लक्ष केंद्रीत करा. ध्यान पूर्ण होईपर्यंत डोळे बंद असावेत, हाताची बोटे एकमेंकात पूर्णपणे सहज गुंफ़लेली व खुर्चीत बसलेला असाल तर पायाची अढी सोडू नका.

श्वासाप्रेक्षा-श्वासानुसंधान

डोळे अलगद बंद करा आणि शरीर शिथील सोडा.

सुखासनात आरामात बसा... ताणमुक्त रहा...

बसण्यात कुठल्याच प्रकारचा त्रास नको...

शांत बसून रहा. कुठल्याही प्रकारची घाई नको...

फक्त शांत... आणि शांत... अगदी शांत...

आपल्या श्वासावर ध्यान केंद्रित करा...

श्वास आत येतांना पहा... श्वास बाहेर जातांना पहा...

पहा श्वासोच्छवास आणि शांत रहा...

श्वासच सगळं काही आहे...

शांत आणि शांत रहा...

आपल्या मनाला पूर्ण विसरा...

श्वास... आत... श्वास... बाहेर... श्वास... फक्त...

फक्त इतकेच...

स्वतःच श्वास बना...

शांत... शांत... अगदी शांत...

फक्त आपल्या श्वासालाच अनुभवा

समापन

इच्छित वेळेइतके ध्यानात बसल्यानंतर, ध्यान स्थितीतून बाहेर येण्याआधी डोळे एकदम न उघडता, आपल्या दोन्हिही हातांनी अलगद आपला चेहरा, डोळे झाकून घ्या. पाच सेकंद या प्रकारे आपल्या तळ्व्यांनी डोळे झाकल्यावर, हळूहळू हात बाजूला घेउन मग अलगद आपले डोळे उघडा. या प्रकारे ध्यानात आपल्या हातांतील साठलेली उर्जा आपण डोळ्यांवाटे आपल्यांत समाविष्ट करतो.

जमल्यास उठण्याआधी थोडावेळ फ़क्त शांत बसून रहा.

नियमित सरावाने आपोआप श्वासाप्रेक्षा सहज होइल, जास्त सराव जास्त चांगले परिणाम देईल.


ध्यान इतके सहजसोपे ...! इतके सरळ...! मुळीच कठीण नाही...!

No Copyright. Please spread the message of Anapanasati Meditation, Vegetarianism and Spiritual Science to the whole world.
Powered by PyramidEarth