या पृथ्वीवर वेगाने होत असलेल्या जागतीक आध्यात्मिक क्रांतीचा पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट महत्वाचा भाग आहे. मानव जातीला हिंसेकडून अहिंसेकडे मांसाहाराकडून शाकाहाराकडे अंधश्रध्देकडून शास्त्रोक्त प्रयोगाकडे आणि शास्त्रीय तर्काकडे वेडया ऐहीकतेकडून शहाण्या आध्यात्मिकतेकडे नेणारी ही चळवळ आहे.
ब्रह्मर्षि पत्रीजींनी स्थापन केलेली पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुव्हमेंट ही पृथ्वीवरील व चालू काळातील सर्वात आघाडीची नवयुग चळवळ आहे. शास्त्रीय पाया असलेले ध्यान प्रथमच ग्रामिण जनतेला तसेच शहरी लोकांनाही उपलब्ध झाले आहे. प्रथमच मोठया प्रमाणात पिरामिड ऊर्जेचा वापर ध्यानासाठी होत आहे. पत्रीजींच्या असामान्य प्रशिक्षणाखाली तयार झालेल्या हजारो पिरामिड मास्टर्सनी आध्यात्मिक जागतिकीकरणाच्या महान कार्याला पूर्णपणे वाहून घेतलेले आहे. पिरामिड मास्टर्स आनापानासति ध्यानशास्त्र व शाकाहाराचा संदेश भारताच्या कानाकोपर्यात पसरविण्याचे काम युध्द पातळीवर करीत आहेत.
दि पिरामिड स्पिरीच्युअल सोसायटी मुव्हमेंटची सुरूवात ब्रह्मर्षि पत्रीजींनी १९९० मध्ये कर्नूल (आंध्रप्रदेश) स्पिरीच्युअल सोसायटी स्थापन करून केली. १९९१ मध्ये तेथे ३० x ३० फुट पिरामिड बांधून बुध्द पिरामिड मेडिटेशन सेंटर सुरू केले. नंतरच्या ३ ते ४ वर्षात आंध्रप्रदेशात ही चळवळ फोफावली. २००४ पर्यंत संपूर्ण आंध्रप्रदेशातील प्रत्येक गावापर्यंत आनापानसति ध्यान पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवून पूर्ण वेळ देऊन समर्पितपणे काम करणार्या शेकडो पिरामिड मास्टर्सनी ध्यान आंध्रप्रदेशचे लक्ष्य २००४ साली गाठले.
आंध्रप्रदेशचे कार्य चालु असतानाच पत्रीजींनी १९९८ पासून शेजारच्या कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश इ. राज्यात दौरे करून प्रसार केला. २००४ नंतर अंदमान, दिल्ली, उत्तरांचल, तामिळनाडू, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, केरळ इ. राज्यात शेकडो पिरामिड मास्टर्सना प्रशिक्षित केले. संपूर्ण देश आध्यात्मिक क्रांतीत सामिल झाला. २००८ पर्यंत भारतातील सर्व राज्यात आनापानासति ध्यान पोहोचविण्याचे ठरले.
पत्रीजींनी १९९९ मध्ये १५ दिवस सिंगापूर व हाँगकाँगमध्ये ध्यानवर्ग घेऊन इतर देशात कार्य करायला सुरूवात केली. २००४ साली पत्रीजींनी अमेरिकेचा ६० दिवसांचा ध्यान दौरा केला. २००५ मध्ये श्रीलंकेत ४० पिरामिड मास्टर्ससह ७ दिवस प्रसार केला. २००६ व २००७ मध्ये ऑस्ट्रेलिया व भूतानला गेले. २०१२ पर्यंत आनापानसति ध्यान जगातील सर्व देशात पोहोचविणे हे पिरामिड मास्टर्सचे मोठे स्वप्न आहे. इंग्लंड, इजिप्त, मलेशिया, दुबई, न्युझिलंड इ. अनेक देशात कार्य सुरू केले .
पिरामिड आंध्रप्रदेश, पिरामिड भारत आणि शेवटी पिरामिड जगत हे ध्येय समोर ठेवून गावोगावी लहान मोठे पिरामिड उभारण्याचे काम सुरू असून २०१६ पर्यंत सर्व जगात ध्यानासाठी पिरामिड उपलब्ध व्हायला हवेत.
No Copyright. Please spread the message of Anapanasati Meditation, Vegetarianism and Spiritual Science to the whole world.
Powered by PyramidEarth