पिरामिड ऊर्जा

(बिल श्युल व एड् पेटिट)

चार उतरत्या त्रिकोणाच्या बाजु एका चौरस पायावर टेकलेल्या आणि त्या चारही त्रिकोणांची वरची टोके एका बिंदूवर एकत्र येऊन वरचे टोक-शिखर झालेला घन आकार म्हणजे पिरामिड होय. प्रत्येक त्रिकोण उतरता आहे. या द्विसमभूज त्रिकोणाच्या दोन्ही उतरत्या बाजू सारख्या आणि पायाशी केलेला कोन समान असतो. दोन्ही बाजूंची लांबी समान, सर्व त्रिकोण एकमेकांसारखे आणि समान क्षेत्रफळ असतात.

ही भौमितिक रचना वैश्विक उर्जा गोळा करते आणि पसरवते. हे सत्य परातन इजिप्शियन लोकांना दहा हजार वर्षांपूर्वी माहित होते. त्यांनी त्यांचे पिरामिड बांधले तेव्हा या कल्पनेचा उपयोग केला. पिरामिड ही विश्वापासून मिळवलेल्या उर्जेची गोदामे आहेत. पिरामिडची शक्ती, पृथ्वीची गुरूत्वाकर्षण शक्ती व प्रसारित झालेली वैश्विक ऊर्जा यांच्या योग्य मिश्रणातून मिळविली जाते.

विद्वानांना माहित आहे की गिझा येथील महान पिरामिड, जाणिवपूर्वक, शरीर बाहय अनुभवांच्या यंत्रणेतून बदललेल्या उच्चतर जाणीव स्थितीचे-ध्यानाची दीक्षा देण्याचे साधन आणि जागा म्हणून बांधले गेले.

पिरामिड शक्ती

मानव निर्मित पिरामिडमध्ये अनेक प्रयोग केल्यानंतर दृष्टोपत्तीस आलेल्या पिरामिड शक्ती अशा आहेत.

जोपासना (प्रिझर्वेशन) - पिरामिड ऊर्जा, फळ, दूध आणि इतर नाशवंत वस्तु सुस्थितीत ठेवते, फळांचा रस, कॉफी इत्यादींची चव सुधारते. वापरलेल्या सुर्‍या, दाढीचे ब्लेड धारदार होतात. दुर्गंधी नाहीशी होते. खोली प्रसन्न वाटते.

बरे करणे (हीलिंग) - जखमा, फोड, खरचटणे लवकर बरे होते. जास्त असलेले वजन कमी होते व रोग प्रतिकार शक्ति वाढते. अस्थमा, दात दुखी, डोके दुखी, सर्दी, उच्च रक्तदाब, सांध्याची सूज व दाब, हृदय धडधडणे, झोप न येणे, फिट येणे इत्यादी आजारांमध्ये आराम पडून ते आजार पूर्ण बरे होतात. पिरामिड ऊर्जेतील पाणी प्यायल्याने डोळे येणे व डोळयांचे इतर आजार बरे होतात, अन्नपचन सुधारते, त्वचा आरोग्यवान व तजेलदार होते.

शरीर बाहय अनुभव - पिरामिडमध्ये ध्यान केल्याने शरीरबाहय अनुभव खुप सोपे होतात. स्वप्ने प्रत्यक्ष दृष्याप्रमाणे स्पष्ट होतात.

पिरामिड बांधणी

पिरामिड कोणत्याही साहित्यापासून बनवता येतात. प्रत्येक एक फूट उंचीच्या पिरामिडसाठी त्याची बाजू १.४९४५ फूट आणि पाया १.५७०८ फूट असेल. बाजू ही वरच्या टोकापासून मोजली जाते व उंचीही वरच्या टोकापासून पाया पर्यंतची उभी उंची असते, म्हणजे वरच्या टोकापासून पायापर्यंतची लंब उंची. जेव्हा पिरामिडच्या बाजू योग्य जागी असतात तेव्हा त्या पायाशी ५१º ५२’ चा कोन करतात, अशी होते तयार, महान पिरामिडची लहान प्रतिकृती. पिरामिडची एक कड-बाजू उत्तर दिशेला समांतर हवी.

No Copyright. Please spread the message of Anapanasati Meditation, Vegetarianism and Spiritual Science to the whole world.
Powered by PyramidEarth