आहाराचा परिणाम मनावर होतो. कोणत्याही प्रकारच्या योगाचा अभ्यास करताना शाकाहार अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळे मन सात्विक, शुध्द आणि संतुलित होते.
- रमण महर्षि
जिवंत प्राण्यांमध्ये भयाचे कारण होऊ नये या भितीने तरी करूणामय होण्यासाठी स्वतःला शिस्त लावून घेणार्या बोधिसत्वाने मांस भक्षण करण्यापासून दूर रहावे.
- गौतम बुध्द
मारलेल्यांना खाणे म्हणजे मृत्युचे खाद्य बनणे. दुसर्याच्या वेदनेवर जगणे म्हणजे वेदनेचे भक्ष्य होणे, ही या सर्व शक्तीमान ईश्वराचीच इच्छा आहे. हे जाणून घ्या व तुमचा मार्ग निवडा.
- मिखाईल नैमी
मांसाहाराच्या धंद्यात असलेला प्रत्येकजण जो मदत करतो, जो कापतो, जो हत्या करतो, जो विकतो, जो तयार करतो, जो देतो, जो खातो हे सर्व मारेकरी व खुनी आहेत.
- भगवान श्रीकृष्ण
प्राण्यांना कसे वागवले जाते यावरून त्या देशाचा मोठेपणा आणि त्याची नैतिक उन्नती ओळखता येऊ शकते.
- महात्मा गांधी
जोपर्यंत कत्तलखाने आहेत तोपर्यंत रणांगणे असतील. शाकाहार ही मानवतेची खरी कसोटी आहे.
- लिओ टॉलस्टॉय
प्राणी आपले भाऊ आणि बहिणी आहेत. कारण माणूस त्यांच्यापासून आला आहे. ते आपले कुटुंब आहे. माणसाला मारणे म्हणजे विकसित प्राण्यालाच मारणे आहे. प्राण्यांची हत्या करणे म्हणजे अविकसिताला मारणे होय.
- ओशो
ठार मारलेल्या जनावराचे शरीरातील मांस, त्याचे स्वत:चे थडगे होईल. कारण मी तुम्हाला सत्य सांगतो, जो दुसर्याला मारतो, तो स्वत:लाच मारतो. हत्या करणारा, स्वत:चीच हत्या करतो आणि ठार मारलेल्या जनावराचे मांस खाणारा मृत्युचे शरीर खातो.
- येशु ख्रिस्त
शाकाहाराची आध्यात्मिक बाजू म्हणजे ते अतिशय स्वच्छ व अहिंसक आहे ! “तू हत्या करणार नाही व कोणालाही ठार मारणार नाही” वनस्पतिजन्य आहार आपल्याला अधिक महान, अधिक सुखी आणि अमर्याद बनवतो.
- चिंग हाई
तुम्ही बळी दिलेल्यांचे मांस आणि रक्ताचा नैवेद्य देवाला आवडत नाही. त्याला तुमच्याकडून संपूर्ण श्रध्देशिवाय वेगळे काहीच अपेक्षित नसते.
- कुराण (22:37)
मांसाहार खरा विकासासाठी अत्यंत बाधक आहे व त्याचा सुक्ष्म शरीर आणि मनोमय कोष या दोन्हीवर अत्यंत अनिष्ट परिणाम होतो.
- सी. डब्ल्यु. लीडबीटर
सजिव प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग केल्याने निर्माण होणार्या व मांस खाण्याने वाढत जाणार्या वेदनांना, मांस खाणारे लोक जबाबदार असतात.
- ऍनी बेझंट
शाकाहाराची निवड करणे लोकांसाठी शुभ आणि शांततामय असते.
- अल्बर्ट आईन्स्टाईन
No Copyright. Please spread the message of Anapanasati Meditation, Vegetarianism and Spiritual Science to the whole world.
Powered by PyramidEarth