ब्रह्मर्षी पत्री जी

"सुभाष" यांचा जन्म १९४७ साली निझामाबाद(आंध्र प्रदेश) जिल्ह्यातील शक्करनगर,बोधन येथे श्री. वेंकट रमणा राव आणि आई सवित्रीदेवी पत्री यांच्या घरी झाला. "सुभाष" यांनी ध्यानाचा काही सखोल अभ्यास केल्यानंतर १९७९ साली आत्मज्ञान प्राप्त झाले. तेंव्हापासून जगातील सर्व लोकांना ध्यान शिकवण्यासाठी आणि त्यांना आत्मज्ञानी बनवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. १९७९ साली, आंधरप्रदेशातील तिरूपती येथे सर्व पिरॅमिड मास्टर्सने एकत्र येऊन पत्रीजींना "ब्रह्मर्षी" ही उपाधी प्रदान केली. नुकतेच २०१८ साली हिमालयातील महापुरुषांच्या मार्गदर्शनानुसार, पिरॅमिड व्हॅली इंटरनॅशनल, बंगळुरू, येथील ग्लोबल फेस्टिव्हल ऑफ स्पिरिच्युअल साइंटिस्ट या कार्यक्रमात पत्रीजींना"पितामह"ह्या उपाधीने संबोधण्यात आले.



BRAHMARSHI PATRIJI



PATRIJI & SWARNAMALA PATRI



PATRIJI FAMILY

पत्रीजींचे माता-पिता

निझामाबाद जिल्ह्यातील शक्करनगर, बोधन येथे ११ नोव्हेंबर १९४७ साली पिता श्री. पी. व्ही. रमणा राव आणि आई सावित्री देवी यांच्या घरी पत्रीजींचा जन्म झाला.

पत्रीजींचे पिता पी. व्ही. रमणा राव यांचा जन्म १९११मध्ये 'गुडीवाडा' येथे झाला होता. त्यांनी हैदराबादच्या निझाम कॉलेजमधून बी. एस्. सी. केल्यानंतर उत्तर भारतातील कानपूर येथून 'शूगर टेकनोलॉजी' मध्ये पदव्युत्तर शिक्षण 'वुय्युरु' येथे सुरू केले आणि के. सी. पी. साखर कारखान्यात त्यांनी दोन वर्षे काम केले. नंतर १९३८ मध्ये त्यांना "निझाम शुगर फॅक्टरी लिमिटेड" येथे नोकरी मिळाली. १९६५ साली त्यांना त्यांची सेवानिवृत्ती मिळाली आणि पत्रीजींच्या कुटूंबाने बोधन सोडले आणि 'वरंगल' येथे स्थलांतरित झाले. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ "रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज, वरंगल येथे प्राध्यापक म्हणून काम करत होता.

पी. व्ही. रमणा राव यांनी त्यांचे भौतिक शरीर १९९३ साली सोडले. त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी अक्षरशः पत्रीजींच्या हातात सोडला.

पत्रीजींच्या आई सावित्री देवी यांचा जन्म १९२० साली "गुंटूर"येथे झाला. त्या अतिशय कनवाळू स्वभावाच्या होत्या. त्या संगीतप्रेमी, पाककला संपन्न, हिंदी भाषेच्या उत्तम जाणकार आणि एक महान ध्यानी होत्या. सावित्री देवी दोन वर्षांच्या असतांनाच त्यांना त्यांच्या भावाकडे अलाहाबादला पाठवले गेले. त्या तिथेच लहानच्या मोठ्या झाल्याने त्यांचे हिंदी उत्तम होते. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. काही वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर त्यांच्या पतीच्या स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारामुळे त्यांना वरचेवर मनोरुग्णालयात दाखल करावे लागत असे. अशा सर्व यातनांना सामोरे जात असतांना होणाऱ्या त्रासातही त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे २००६ मध्ये त्यांचे भौतिक शरीर सोडेपर्यंत मोठा आधार दिला.

पत्रीजींचे वडील शैक्षणिक अभ्यासात उत्तम असल्याने त्यांची सर्व मुलं सुद्धा शैक्षणिक अभ्यासात कष्टाळू होती. पत्रीजींचे मोठे भाऊ, पी. के. वेणू विनोद यांनी १९७० - ७४ मध्ये मँचेस्टर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पी.एच. डी. केले. पत्रीजींची बहीण डॉ. सुधा हिने ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये एम. एस. सी. केले आणि तिचे पीएचडी जवळजवळ पूर्ण केले, त्यानंतर दोन मुलांची आई झाल्यावर तीने बंगळुरू मधून एमबीबीएस पूर्ण केले. अरविंद हा त्यांच्या दोन वर्षांनी लहान असलेल्या भावाचा १९६४ साली लुकेमिया मुळे मुंबईत देहांत झाला.

१९६९साली पत्रीजींच्या आईवडिलांनी अंबरपेट, हैद्राबाद येथे एक घर बांधले, ज्या त्यांनी "अरविंद" असे नांव दिले. शक्करनगर येथील ज्या घरात पत्रीजी आणि त्यांची बहीण डॉ. सुधा यांचा जन्म झाला होता, ते घर सुरुवातीला काही वर्षे डॉ. सुधा कोडूरी ह्यांच्या नावाने होते. आता ते घर "सवित्रीदेवी पिरॅमिड मेडिटेशन सेंटर"बनले आहे.

बालपण/उच्च शिक्षण

पत्रींजींचे बालपण शक्करनगर येथे गेले - शेजारीपाजारी यांच्या सहवासात एकत्र कुटुंबाप्रमाणे . त्यांच्या या घराच्या एका बाजूला एक मस्जिद होती ,जी आज सुद्धा अगदी जशीच्या तशी आहे . तसेच काही पावलांच्या अंतरावर एक एक शांत, प्रसन्न आणि विस्तृत असे रामाचे मंदीर होते. निजाम शुगर फॅक्टरी, जी आता मोडकळीस आली आहे, पण त्याकाळात ती एशियातील सर्वात मोठी आणि प्रचंड वर्दळीची अशी होती.

पत्रीजींचे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण शक्कर नगर येथे झाले आणि मग नववी पर्यंतच्या माध्यमिक शिक्षणासाठी ते बोधन गव्हर्नमेंट हायस्कूलला गेले नंतर पत्रिजी सिकंदराबादला राहायला गेले आणि मेहबूब कॉलेज हायस्कूल येथून त्यांनी १९६० ते १९६३ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतले १९६० मध्ये बारावी ते फर्स्ट क्लास ने पास झाले. सिकंदराबाद च्या आर्ट्स आणि सायन्स कॉलेजमधून १९६६ साली त्यांनी बीएस्सी पूर्ण केले त्यानंतर १९६६ साली पत्रीजींनी उस्मानिया युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या आर्ट्स कॉलेज मधून सहा महिन्यांसाठी इंग्रजी लिटरेचर मधून एमए चा अभ्यास केला आणि मग आंध्र प्रदेशातील एग्रीकल्चर यूनिवर्सिटी राजेंद्र नगर हैदराबाद येथे गेले आणि १९६९ साली बीएससी एग्रीकल्चर ची डिग्री घेतली.

सॉइल सायन्स हा विषय घेऊन १९६९ ते १९७४ या काळात पत्रीजींनी त्यांचे एमएससी अग्रिकल्चर पूर्ण केले. १९६९ ते १९७३ या काळात पत्रीजींनी ऑल इंडीया लेव्हलच्या स्पर्धा परीक्षा दिल्या. याच काळात त्यांनी थोडा काही काळ इन्कम टॅक्स ची नोकरी, एमएससी अग्रिकल्चर अशा गोष्टी केल्या, पण मुख्य लक्ष स्पर्धा परीक्षांवर केंद्रीत केले आणि त्यासाठी हैदराबादच्या सर्व वाचनालयांमध्ये ते जात असत आणि सतत वाचन वाचन आणि वाचनच करत असत.

लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार

स्क्रोल करा 2006 नोव्हेंबर मध्ये समग्र आरोग्य रिसॉर्ट, महात्मा गांधी राष्ट्रीय परिषदेत 'लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार' हा पुरस्कार 'आरोग्य सेवा संस्था, सेवाग्राम, वर्धा राहण्याची आणि त्याच्या जागतिक अनुप्रयोग' येथे आयोजित करण्यात समृद्ध होते |



LIFE-TIME ACHIEVEMENT AWARD
Nov, 2006



DHYAN VISHARAD AWARD
Mar, 2013

No Copyright. Please spread the message of Anapanasati Meditation, Vegetarianism and Spiritual Science to the whole world.
Powered by PyramidEarth