ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्या अस्वस्थ मनाला शांत करणे ! त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो ! ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे - डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ति, ऊर्जा जपली जाते जी चांगले आरोग्य, मनःशांती व जीवनाच्या विवेकज्ञानाकडे नेते.
अधिक वाचापिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज् मूव्हमेंटचे संस्थापक ब्रह्मर्षि पत्रीजी यांनी त्यांच्या जीवनात सुरूवातीला स्वतःला आलेल्या सखोल अनुभवांमधून ध्यानाची खरी शक्ति ओळखली आणि १९७९ मध्ये आत्मज्ञान प्राप्त केले. तेव्हापासून जगातील सर्व लोकांना ध्यान व शाकाहार शिकविणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे हे आपले जीवन-ध्येय केले. त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे शास्त्रीय व धर्मातीत असून धार्मिक भावनांना आवाहन न करणारा आहे. अधिक वाचा
पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज् या सर्वांपर्यंत आनापानसति ध्यान, शाकाहार व पिरामिड शक्ति पोहोचविणे हे एकमेव ध्येय ठेवून काम करणार्या निधर्मी, कोणताही पंथ नसलेल्या, नफा न कमावणार्या स्वयंसेवी संस्था आहेत. पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज् मूव्हमेंट ही नवयुगातील जागतिक आध्यात्मिक क्रांतीचा भाग आहे. हिंसाचाराकडून अहिंसेकडे, मांसाहाराकडून शाकाहाराकडे आंधळ्या धार्मिक श्रध्देकडून शास्त्रीय प्रयोगशीलतेकडे व शास्त्रीय तर्काकडे मूढ, तर्कहीन, अजाण ऎहिकतेकडून, सुजाण समजूतदार आध्यात्मिकतेकडे घेऊन जाणारी ही चळवळ आहे ! अधिक वाचा
आध्यात्मिक जीवनासाठी शाकाहार अत्यंत आवश्यक आहे. खरे पहाता आध्यात्मिकता आणि शाकाहार हे समानार्थक शब्द आहेत. प्रत्येकाने शाकाहारी व्हायला हवे. अधिक वाचा
पिरामिड हे सर्वांगिण विकासाचे चिन्ह आहे. पिरामिडला चार बाजू असतात. ते चार जगत दर्शवितात- खनिज जगत, वनस्पति जगत, प्राणी जगत व मानवी जगत. पिरामिडच्या चारही बाजू जेथे एकत्र येतात तिथे ही सर्व एक होतात, हीच आध्यात्मिकता ! अधिक वाचा
No Copyright. Please spread the message of Anapanasati Meditation, Vegetarianism and Spiritual Science to the whole world.
Powered by PyramidEarth