ध्यानाचे फायदे

केवळ आनापानसति ध्यानच माणसाला आध्यात्मिक आरोग्य देऊ शकते. आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.

ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !

ताबडतोब बरे होणे

सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते.

ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याशिवाय रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

स्मरणशक्ती वाढते

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर.

वाईट सवयी नष्ट होणे

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.

मन आनंदी होते

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापी आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

काम कार्यक्षम होते

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असो वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात.

थोड्या वेळात जास्त काम पूर्ण होते. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

झोपेचे तास कमी होतात

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

दर्जेदार नातेसंबंध

आध्यात्मिक विवेक ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.

विचारशक्ती

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

योग्य आणि अयोग्य

काय करावे ? काय करू नये ?

असे प्रश्न नेहमीच फार महत्वाचे - लाखमोलाचे असतात.

काय बरोबर आहे ? काय चुकीचे आहे ?

आपण सतत अशा द्विधा मनस्थितीत असतो !

तथापि अशी द्विधा मनस्थिती फक्त आध्यात्मिकदृष्ट्या अपरिपक्व लोकांसाठीच असते. आध्यात्मिकरित्या परिपक्व व्यक्तीला कोणतेही प्रश्न इतके महत्वाचे नसतात. परिपूर्ण आध्यात्मिक व्यक्तींची मन:स्थिती द्विधा नसतेच.

जीवनाचा उद्देश

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

फायदे

सर्व आजार ताबडतोब बरे होतात.

स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.

वाईट सवयी आपोआप सुटतात.

मन नेहमी शांत व आनंदी अवस्थेत रहाते.

सर्व कामे अधिक कार्यक्षमतेने होतात.

नातेसंबंध अधिक चांगले आणि समाधानकारक होतात.

आवश्यक झोपेचे तास कमी होतात.

विचारशक्ती खूप वाढते.

योग्य व अयोग्य ओळखण्याची शक्ती वाढते.

जीवनाचा उद्देश अधिक चांगला समजतो.

स्वत:चा बोध होतो. (आत्मज्ञान होते.)

आणि बरेच काही.

No Copyright. Please spread the message of Anapanasati Meditation, Vegetarianism and Spiritual Science to the whole world.
Powered by PyramidEarth