ह्या मध्ये खालील अंग आहेत.
खरे पाहता अध्यात्म विज्ञान विषयाचा संपूर्ण उद्देश आहे उच्च ‘स्व’ चे विवेकज्ञान व समज यांचा अर्क निम्न ‘स्व’ मधे जाणण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलो आहोत हे समजणे.
कर्ता-करणारा, ज्ञाता-जाणणारा आणि विचारी-विचार करणारा असे तीन भाग मिळून ‘त्रि-स्व’ म्हणजे उच्च ‘स्व’ बनलेला आहे. करणारा जो भाग आहे तो जिवात्मा म्हणून खाली येतो. उच्च ‘स्व’ ला चेतना शक्ती असेही म्हणतात. ध्यानामध्ये आपण नेहमी आत्म्याला, धडधडणारा-स्पंदन पावणारा त्रिकोण-तीन बाजू असलेला त्रिकोण स्फटिक पहातो.
त्रिकोण पिरामिडच्या बाह्यांगाचे सुध्दा प्रतिनिधित्व करतो. पिरामिडच्या विविध शक्ती आहेत. सूक्ष्म देह प्रवास (ऍस्ट्रल बॉडी ट्रॅव्हल/तारका प्रवास) सोपा करणे पिरामिड ऊर्जेच्या मोठया परिणामांपैकी एक आहे.
सूर्य सुध्दा उच्च ‘स्व’ चे प्रतीक आहे. निम्न ‘स्व’ हा उच्च ‘स्व’चा एक विशिष्ट किरण आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचा उच्च ‘स्व’ उच्च लोकात असतो. म्हणजे आपला स्वत:चा ‘स्व’ त्याच्या विशिष्ट विस्तारातील सर्व किरणासह एकत्रित असतो. या भौतिक शरीरात असतांना आपल्या स्वत:च्या संपूर्णत्वाचे शक्य तितके, जास्तीत जास्त विवेकज्ञान पुन्हा मिळविणे हेच निम्न ‘स्व’/वैयक्तिक ‘स्व’चे ध्येय असते.
अर्धा सूर्य :- कारण या पृथ्वीवरील दृष्टीकोनातून आपण आपल्या महत्तम ‘स्व’चे संपूर्णत्व जाणून घेऊ शकत नाही. फार तर आपण त्याची बाहेरची रूपरेषा पाहू शकू. उरलेले सैध्दांतिक व अंतज्र्ञानानेच समजून घ्यायला हवे.
पि.एस.एस.एम.चे बोधचिन्ह ध्यानात बसलेला माणूस दाखवतो.
ध्यान विज्ञानाचे महत्व वाढविणे-पसरवणे हे पिरामिड स्पिरिचुअल सोसायटी मूव्हमेंटचे (पि.एस.एस.एम.) मुख्य ध्येय आहे. ध्यान करून मिळविलेले आत्मानुभव हाच आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग आहे.
ध्यानामध्ये आपण गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द असलेले शरीर बनतो आणि आपल्या भौतिक शरीरापासून आपला सूक्ष्म देह (ऍस्ट्रल बॉडी) उच्च लोकात मुक्त संचार करण्यास मोकळा होतो. तारका प्रवास (ऍस्ट्रल ट्रॅव्हल) हा महत्वाच्या ध्येयांपैकी एक आहे.
ध्यान म्हणजे आतील ज्ञानेंद्रियाना जागृत करणे. आतील ज्ञानेंद्रिये पूर्ण जागृत झाल्याचे तिसरा डोळा चिन्ह आहे. ध्यानात तिसरा डोळा कार्यरत होऊ लागतो. आणि त्याचा अंतिम परिणाम (भूत व भविष्य) आकाशिक रेकॉर्ड व दृष्टीआड असलेल्या वस्तू स्पष्टपणे पाहण्याची शक्ती मिळण्यात होतो.
जेव्हा ‘तिसरा डोळा’ जागृत होतो तेव्हा काय दिसते? तेव्हा खूप पुढचे दिसते. ‘पर्यायी लहरी’ असलेले विश्वलोक दिसतात. या जगात प्रकट होणाऱ्या सर्व परिणामांची मूळ कारणे पहाता येतात. ‘तिसरा डोळा’ प्राप्त करणे हे सर्व आत्म्यांचे मूख्य लक्ष्य असते.
आभावलय म्हणजे पदार्थाच्या सर्व वैयक्तिक ऊर्जांना झाकणारा कोष किंवा वलय.
चक्र म्हणजे ऊर्जा शरीरातील प्राणिक शक्तिंची प्रमूख बिंदु स्थाने.
आधुनिक काळातील लहान आकाराच्या पिरामिडमध्ये अनेक लोकांना आलेले अनुभव दर्शवितात कि स्वत:च्या ऊर्जा-जाणीव-विवेकज्ञान (Energy-consciousness-wisdom) यात प्रगती करणे हाच पिरामिड रचनेमागील उद्देश आहे.
पिरामिड ध्यानाच्या कल्पनेचे महत्व सांगणे हा पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मूव्हमेंटच्या मुख्य उद्देशांपैकी एक उद्देश आहे. पिरामिडमध्ये केलेले ध्यान तिप्पट जास्त प्रभावी असते.
आपण सर्व E.C.W. व्यक्ती आहोत. या संपूर्ण अस्तित्वात अशी कोणतीच गोष्ट नाही कि जी उर्जा-जाणीव-विवेकज्ञान नाही. सर्व जीवमात्रात फरक असतो. तो फक्त E.C.W. च्या प्रभावात. उर्जा जाणीव व विवेकज्ञान प्रत्यक्ष रीतीने त्या त्या प्रमाणात असतात. याचा अर्थ आपण जर अधिक ऊर्जावान असू तर जाणीवही अधिक व त्याचा परिणाम, अधिक विवेकज्ञान प्राप्त करू. जर आपल्याला विवेकज्ञान जास्त असेल तर जाणीवही जास्त व आपण उर्जावानही अधिक जास्त असू. आपल्या सर्व अनुभवांचे सार ज्याला आपण विवेकज्ञान म्हणतो, युगायुगातील अनुभवाची बेरीज असते. विवेकज्ञान हे आपल्या सगळया पूर्वजन्मातील ज्ञान माहिती व अनुभव यांचे सार आहे.
निम्न स्वच्या जीवन काळाला आवश्यक उद्देश E.C.W. वाढविणे. त्याचा अर्थ आध्यात्मिक वाढ-उत्क्रांती होय.
उघडे पुस्तक हे स्वाध्याय किंवा आध्यात्मिक पुस्तकांच्या अभ्यासा संदर्भात आहे. लोबसंग राम्पा, रिचर्ड बाख, जेन रॉबर्टस्, कास्टनेडा, लिंडा गुडमन, एडगर साईस, स्वामी रामा, योगानंद परमहंस इत्यादिं सारख्या महान संतांची पुस्तके लोकांना वाचायला लावणे हे पि.एस.एस.एम.चे सर्वात महत्वाचे अंग आहे.
आपल्या भौतिक अस्तित्वासाठी फक्त आपणच जबाबदार आहोत. फक्त आपणच आपल्याला मार्ग (प्रकाश) दाखवू शकतो. इतर लोक कदाचित मार्गदर्शन करतील. पण ते आपल्याला घडवू शकत नाही! प्रत्येक क्षणी आपणच आपले वास्तव निर्माण करत असतो हे आपण समजून घ्यायला हवे. आपल्या विशिष्ट इच्छांची, विशिष्ट वातावरणाची निवड करण्यासाठी व त्यातील शुध्दता राखण्यासाठी स्वतंत्र रहायला शिकण्याइतके आपण विवेकी असायला हवे. फक्त दृढ इच्छाच वातावरणात त्यांच्या प्रतिकृति/प्रतिमा निर्माण करतात. आपण वरच्या आध्यात्मिक व सोप्या पातळीवर जाण्यासाठी हे सर्वाधिक योग्य आहे.
No Copyright. Please spread the message of Anapanasati Meditation, Vegetarianism and Spiritual Science to the whole world.
Powered by PyramidEarth