पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीच्या गुरूंसाठी १८ मार्गदर्शक तत्त्वे

 

पिरामिड मास्टर्सनी

१) नेहमी योग्य त‍र्हेने ध्यान करावे. म्हणजेच आनापानसति ध्यान करावे व ते प्रत्येकाला शिकवावे.

२) नेहमी आध्यात्मिक पुस्तके वाचावी किंवा त्याबद्दल लिहावे व इतरानांही योग्य पुस्तके सुचवावीत.

 उदा. स्वामी रामा, योगानंद परमहंस, ओशो, लॉबसंग राम्पा, जेन रॉबर्टस्‌, रिचर्ड बाख, अ‍ॅनी बेझंट,

 लींडा गुडमन, खलील जिब्रान, दिपक चोप्रा, वगैरेंची आध्यात्मासंबधीची पुस्तके सुचवावीत.

३) आपले अनुभव एकमेकांशी चर्चा करून उघड करा व त्याचा उपयोग आयुष्यात सूज्ञपणा वाढवायला करा.

४) रोज थोडा वेळ तरी मौनात रहा.

५) पौर्णिमेचा दिवस व रात्र ध्यानात रहा. शक्यतो ह्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजे अरण्यात, वनात, अथवा डोंगरावर ध्यान करा. पौर्णिमा ध्यान शक्यतो चुकवू नका.

६) जर सहज शक्य असेल तर पिरामिडची ताकद ध्यानासाठी वापरा.

७) सर्व औषधे विसरा. ध्यानातून स्वतःच रोगप्रतिकारक उर्जा, ताकद निर्माण करा.       

८) मांसाहार करू नका, अगदी अंडे सुध्दा नकोच.

९) गरजेपुरते खा पण शाकाहारी रहा.

१०) मुद्दामहून विरक्तीचे कपडे, वस्तू वगरै वापरू नका.

११) लहान मुलांना योग्य तर्‍हेने ध्यान शिकवून त्यांच्यात ध्यानाबद्दल गोडी निर्माण करा.

१२) प्रत्येकाने ध्यानात प्रगती करून गुरू झाले पाहिजे ही प्रवृत्ती जागवा, ना की त्याने कोणाचेही शिष्यच रहावे.

१३) ध्यान शिकविण्यासाठी द्रव्य घेऊ नका.

१४) ध्यान शिकताना, शिकविताना कोणाचीही मुर्तीपूजा करू नका.

१५) स्वतःच्या वैयक्तिक अडचणींवर स्वतःच ध्यानाने मात करायला शिका.

१६) स्वतःचे आयुष्य कुंटुंबाबरोबर सुंदर जगा.

१७) पिरामिड ध्यान केंद्रे खेडोपाडी व शहरातून झालीच पाहिजेत, त्यासाठी आग्रही कृती करा.

१८) स्वतःचे ध्यानाचे अनुभव प्रकाशित करून विज्ञान व नैसर्गिक आयुष्य संगतीने जगण्याचे तंत्र

 विश्वस्तरावर लवकर नेऊन पोहचवू या. 

 

अध्यात्म विज्ञानाचा आणि नैसर्गिक जीवनाचा वैश्विक स्तरावर शक्य तितक्या लवकर पुनरूध्दार करू या !

 

विवरण...

Go to top