ध्यानाचे शास्त्र

भौतिक विज्ञानातील गतीचे व उष्णतेचे तीन नियम खूप प्रसिध्द व महत्वाचे आहेत. तसेच अध्यात्म शास्त्रातील खालील तीन नियम समजून घेणे खूप आवश्यक व महत्वाचे आहेत.

ध्यान म्हणजे -
जसा आपण आपल्या बायको-मुलांबरोबर, मित्र, शेजारी, नातेवाईकांबरोबर वेळ घालवतो, तसेच स्वत:बरोबर वेळ घालवणे, स्वत:बरोबर राहणे, स्वत:वर प्रेम करणे आवश्यक आहे.


एका ठिकाणी आरामात बसून हाताची बोटे गुंफवून, डोळे मिटून, आपल्या नेहमीच्या श्वासाचे अलिप्तपणे निरीक्षण करत आपले मन पूर्ण रिकामे - विचारशून्य करणे म्हणजे ध्यान. ध्यान शास्त्र अगदी सोपे आहे.

पहिला नियम
जेव्हा आपण आपल्या नेहमीच्या, नैसर्गिक, साध्या, सोप्या, नाजूक, शांत श्वासाच्या प्रवाहाबरोबर असतो तेव्हा आपले मन रिकामे होते.


श्वास हा शरीराचा भाग नाही, पण तो शरीरात आहे. श्वास हा काही पदार्थ वा वस्तू नाही, पण लक्ष केंद्रीत करण्यास तो पुरेसा आहे. श्वास ही सतत न थांबता होणारी गोष्ट आहे ! शरीरातील शुध्द जाणीवेचा श्वास हा राजदूत आहे. श्वास खूप साधा आहे. श्वास आपण अनुभवू शकतो. श्वास आपण पकडू शकतो.


श्वासाबरोबर आपण आपली तार जुळवायची आहे. जेव्हा आपण आपल्या श्वासाबरोबर राहतो तेव्हा आपले मन रिकामे होते. हा पहिला नियम आहे. महान ध्यान शास्त्राचा हा नियम आहे.
ध्यान म्हणजे मन शांत करणे. त्याची सुरूवात आपण श्वासाबरोबर राहून करतो ! ध्यान करताना आपण कोणताही मंत्र म्हणत नाही. कोणताही जप करत नाही. तोंड बंदच ठेवायला हवे. तोंड हे या ऐहिक जगाचा भाग आहे. म्हणून ध्यान शास्त्रात त्याचा उपयोग नाही.


ध्यान म्हणजे मनाला शांत करणे आहे, म्हणून आपण कोणत्याही मानसिक प्रतिमेवर लक्ष केंद्रीत करायचे नाही. आपल्याला आपले मन शून्य करायचे आहे. म्हणून भ्रुकुटी मध्यावरील (दोन डोळयांच्या मध्यभागी) बिंदू धरून ठेवायचा नाही. मन श्वासाबरोबरच असायला हवे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. जर मन श्वासाबरोबर नसेल तर मन रिकामे होत नाही. मन पूर्ण रिकामेच असायला हवे. त्यात हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, कम्यूनिस्ट इ. कोणत्याही मानसिक प्रतिमा नकोत.


दुसरा नियम
मन रिकामे झाल्यावर आपल्या भौतिक शरीरात वैश्विक उर्जा प्रचंड प्रमाणात वाहू लागते.
आपले विचारांनी भरलेले जंगली-रानटी मन हाच अडथळा आहे. आपले जंगली मन वैश्विक उर्जेला शरीरात प्रवेश करू देत नाही. जेव्हा मन जंगलासारखे असते तेव्हा ते मोठा अडथळा असते. जंगली मन एवढं घट्ट असते की त्यात शिरकाव करणे फार कठिण असते. हे घट्ट मन जेव्हा द्रवरूप किंवा वायूरूप मन होते तेव्हा त्यातून वैश्विक उर्जा झिरपू लागणे शक्य होते. मन पूर्ण रिकामे होणे आवश्यक आहे.


शारिरीकउर्जा व वैश्विक उर्जा यांना वेगळे करते ते मन. मन जंगलाप्रमाणे असते तेव्हा शारिरीक उर्जा व वैश्विक उर्जा यांना विभागणारी ही रेषा मोठा अडथळा बनते.


जेव्हा मनातील सर्व विचार थांबतात, नाहीसे होतात तेव्हा हा घट्ट अडथळा मऊ होतो. थोडा मोकळा, प्रवेशक्षम होतो आणि हे शक्य होते फक्त श्वासाबरोबर राहिल्याने.


झाडाच्या मुळाशी असणाऱ्या अभिसरण (ओस्मोटिक) दाबाबद्दल आपण समजू शकतो. बाहेरील पौष्टिक द्रव्य मुळांमध्ये प्रवेश करतात कारण प्रत्येकाच्या मुळाचे टोक अर्धेअभिसरणक्षम, अर्धेप्रवेशक्षम असते. हीच गोष्ट आपले मन जेव्हा रिकामे असते तेव्हा होते. घट्ट अडथळा सच्छिद्र बनतो आणि वैश्विक उर्जेचा नैसर्गिक प्रवाह आपल्या स्थूल शरीरात वाहू लागतो.


तिसरा नियम
जड शरीरात पुरेशा प्रमाणात वैश्विक उर्जा वाहू लागल्यावर तिसरा डोळा योग्य प्रमाणात कार्यान्वित होतो, जागृत होतो !


शेवटी ध्यानाची परिणीती आपली इंद्रिये - अंतेंद्रिये जागृत होण्यात होते. आपले सहावे इंद्रिय जागृत होते. आपल्याला आत्मजाणीव होते. आपला आत्मा आपल्याला सापडतो.


सर्वसामान्य माणसाचा आत्मा हरवलेला असतो. नंदनवन नाहीसे झालेले असते. ते नंदनवन परत मिळवायचे आहे. आपला आत्मा हेच नंदनवन आहे.


जड-स्थूल शरीर बौध्दिक उर्जेने पूर्ण भरायला हवे. शरीर वैश्विक उर्जेने पूर्ण भरून वाहू लागल्यावर आत्म्याची सुप्तशक्ति हळुहळू जागृत होते. नाहीतर ती सुप्तशक्ति झोपलेलीच असते.


आत्म्याची अव्यक्त शक्ति अमर्याद आहे. जोपर्यंत आपण ध्यान करून ही शक्ति जागृत करत नाही तोपर्यंत ती शक्ति सुप्त असते.


सर्व शरीर व मनाच्या गोष्टी शरीर, मन आणि आत्म्याच्या गोष्टी व्हायला हव्यात. याच ठिकाणी ध्यानशास्त्र प्रवेश करते. ध्यानशास्त्र - ध्यान विज्ञान हे सर्व इतर शास्त्रांची माता आहे, जननी आहे, आई आहे. ध्यानशास्त्र हे आनंदाचे, सुखाचे शास्त्र आहे. ध्यानशास्त्र हे जास्तीत जास्त ऊर्जाशक्ती मिळविण्याचे शास्त्र आहे. ध्यानशास्त्र हे सर्व शास्त्रज्ञांना एकत्र आणणारे एकमेव शास्त्र आहे. मानवतेला विभागणाऱ्या धर्मांना, पंथांना ते एकत्र आणते.

ध्यान शास्त्राचा विजय असो ! ध्यान विज्ञानाचा विजय असो !

Go to top