पत्रीजींची वचने

 

"पृथ्वीवर एक महान आध्यात्मिक क्रांतीचा विस्फोट घडत आहे. पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंट ऑ‌‌‌‌‌फ इंडिया या विशाल बदलाचा एक महत्वपूर्ण भाग आहे."


* * *


"सर्व ’तन मन’ अस्तित्वे ’तन मन आत्मा’ अस्तित्वे बनली पाहिजेत. मानवतेने हि विशाल परिवर्तनाची उडी मारलीच पाहिजे. इथेच ध्यानाचे विज्ञान प्रवेश करते".


* * *


"सर्व शारिरिक आजार हे मानसिक काळज्यांमुळे आहेत. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वतेमुळे आहेत. बौध्दिक अपरिपक्वता हि आध्यात्मिक ऊर्जेच्या अभावामुळे, आध्यात्मिक ज्ञानाच्या अभावामुळे आहे."


* * *


"जेव्हा आपण आपल्या श्वास ऊर्जेबरोबर असतो, आपण आपले मन वैश्विक ऊर्जा भरण्यासाठी रिक्त करतो"


* * *


"ध्यानाचे शास्त्र अगदी सोपे आहे, ’जेव्हा आपण आपल्या श्वासाबरोबर असतो, आपले मन रिकामे होते..’ हा ध्यान शास्त्राचा पहिला नियम आहे."


* * *


"जितके ध्यान आपण जास्त करु, ...तितकी आपली झोपेची गरज कमी होईल. जितके ध्यान आपण जास्त करु, तितकी अन्नाची गरज कमी होईल. चेतनेला जितके जास्त खाद्य, तितकी शरिराला अन्न, झोप यांची कमी गरज"


* * *


"प्राणी नेहमीच सुखी आणि प्रशांत असतात, तुम्ही सहसा ’खिन्न’ प्राणी बघू शकत नाही. प्राणिजगताच्या प्रत्येक सदस्याला मृत्यु ही अटळ अद्भुत घटना असल्याची जाणिव आहे. प्रत्येक प्राण्याला इतरांकडून काही अपेक्षा ठेवू नये ही समज आपोआप असते. सर्व काही निसर्गनियमाप्रमाणे घडते हे प्रत्येक प्राण्याला पूर्णपणे माहीत आहे"


* * *


"विनाशकारी विचार मनात आल्याबरोबर तो त्वरित खोडून काढला पाहिजे. आपण सदैव आपल्या मनातील सर्व विनाशकारी विचार झाडून काढले पाहिजेत. आपल्या आयुष्यातील सर्व विनाश निव्वळ आपल्या विनाशकारी विचारांमुळे घडत आहेत."


* * *


"जसे आपले मन असेल ...तसे आपले जीवन असेल. आपले जीवन हे आपण जे काही केलेले सर्व पुरातन भूतकालीन इरादे आणि आपण आत्ता या जीवनामधे करित असलेले इरादे यांची एकूण गोळाबेरिज आहे"


* * *


"श्वास हे दिव्यचक्षू जागृतीचे महान द्वार आहे. दिव्यचक्षू म्हणजे आत्म्याचे सारभूत तत्व आहे."


* * *


"सध्या पृथ्वी एका सर्वात विषेश यात्रेच्या मध्यावर आहे. संपूर्ण पृथ्वी एका विशिष्ट आकाशगंगीय फोटॉ‌‌‌‌‌न बँड मध्ये प्रवेश करित आहे...जो एक उच्च वैश्विक ऊर्जेचा प्रभाव  आहे. आपल्या सौर व्यवस्थेच्या फोटॉ‌‌‌‌‌न बँड मधील रुपांतरणाची प्रक्रिया १९८७ साली सुरु झाली आणि ती २१ डिसेंबर २०१२ पर्यंत पूर्ण होईल"


* * *


"चेतना हे मुलभूत शाश्वत सत्य आहे. विचार हे चेतनेचे कार्य आहे. ऊर्जा ही विचारांची उपज आहे. आणि सरतेशेवटी, पदार्थ (matter) म्हणजे उर्जेचे स्फटिकिकरण अथवा घनीभवन आहे."


* * *


"ध्यान करणे, योग्य आध्यत्मिक विज्ञानावरची पुस्तके वाचणे, इतरांचे ध्यान विषयक अनुभव ऎकणे... हे ध्यान साधनेसाठी नितांत गरजेचे आहे."


* * *


"रोग हे मुख्यत्वे नकारात्मक पूर्व कर्मांमुळे आहेत. जोपर्यंत नकारात्मक पूर्व कर्म नाहिसे होत नाही, रोग पूर्ण जात नाही. कुठलेच औषध उपयोगी पडणार नाही. पदार्थ नकारात्मक पूर्व कर्मे नाहिसे करु शकत नाहित. ते अशक्य आहे. फक्त शिकलेले धडेच नकारात्मक पूर्व कर्मे नाहिसे करु शकतात"


* * *


"लक्षात ठेवूयात, की प्रार्थना म्हणजे ध्यान नव्हे, आणि ध्यान म्हणजे प्रार्थना नव्हे. ते एकमेकांपासून उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असावेत इतके दूर व वेगळे आहेत. "


* * *


"प्रार्थना दूरच्या चौकी समान आहे तर ध्यान प्रमुख मुख्यालय आहे. मुख्यालयासाठी प्रयत्न करा, चौकिसाठी नाही."


* * *


"परमेश्वर कुठली विशिष्ट व्यक्ती नव्हे. परमेश्वर म्हणजे मूळ चेतना आधार होय. आपण सर्व देव आहोत. सर्वकाही परमेश्वर आहे. आपण फक्त हे जाणून घेउन उत्क्रांत झालो पाहिजे."


* * *


"आपण ही भौतिक शरीरे नाही आहोत,... आपण सुंदर, शाश्वत चेतनेचे खंड आहोत."


* * *


"आध्यात्मिक आरोग्य ’मूळ’ आहे
भौतिक आरोग्य ’फ़ळ’ आहे"


* * *


"आध्यात्मिकता म्हणजे ’वास्तवा’त जगणे, त्यापासून दूर पळणे नाही"


* * *

Go to top