(आध्यात्मिक जीवन - आध्यात्मिक जगणं)
प्रश्न तुमचे, उत्तरे ब्रह्मर्षि पत्रीजींची

 

प्रश्न: माझ्या जीवनाचे उद्देश काय आहे?


उत्तर: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे उद्देश संपूर्ण जीवन अत्यंत शांतपणे, अगदी सुखात, आरामात, अतिशय आवडीने, पूर्णदयेने, सावधानपूर्ण व समग्र ज्ञानाने जगणे हा असतो.
नेहमी शक्य तितके शांत रहा.


जेवढे शक्य असेल तेवढे स्वतःला सुखी समाधानी करा.


तुमच्या सर्व आवडत्या गोष्टींची जास्तीत जास्त प्रेमाने काळजी घ्या.


कोणत्याहि क्षणी तुमच्या सभोवताली असलेल्या सर्वांचे म्हणणे पूर्ण सहानुभूतीने ऐका.
तुमच्या आत आणि तुमच्या भोवती घडणार्‍या सर्व गोष्टींबाबत शक्य तेवढे सावध रहा.
तुमच्या आत आणि तुमच्या सभोवती असलेल्या सर्व गोष्टींबद्दल जास्तीत जास्त ज्ञान मिळवा.

 


प्रश्न: अनास्क्ति म्हणजे काय?


उत्तर: लक्ष वेधून घेणार्‍या व महत्वाच्या स्थानापासून स्वतःला दूर ठेवणे...त्या विशिष्ट परिस्थितीत, प्रसंगात, स्वतःला कोठेहि आणि केव्हाहि आपण नगण्य असणे.

 


प्रश्न: स्वतःच्या चुकीच्या मानसिक सवयी कशा मोडाव्यात?


उत्तर: चुकीचा असा शब्द वापरण्यापेक्षा निष्फळ असा शब्द वापरणे अधिक चांगले. त्याचं कारण असं आहे की मूलतः काहीच चुकीचे किंवा बरोबर नसते. प्रत्येक गोष्ट एकतर जास्त फायदेशीर असते किंवा किमान फायदेशीर असते एवढच.


तीच क्रिया पुन्हा पुन्हा करण्याला सवय म्हणतात. मनाच्या मानसिक नमुन्यातून सवयी निर्माण होतात आणि नंतर त्यांच्याशी संबंधित शरीराच्या आकारात स्पष्ट होतात.


प्रत्येक विचार हा प्रथमतः मनाची क्रिया असते. म्हणून जेव्हा एकसारख्या प्रकारचे विचार पुन्हा पुन्हा येतात, तेव्हा विशिष्ट विचारांचा नमुना निर्माण होतो. आणि हा विचारांचा नमुना फलदायी किंवा निष्फळ असू शकेल. जेव्हा व्यक्तिगत विचारांचा कित्ता निसर्गाच्या वैश्विक कायद्यांचा प्रतिध्वनि असतो, तेव्हा आपोआप ते विचार फलदायी होतात. याउलट जेव्हा व्यक्तिगत विचार निसर्गाच्या वैश्विक कायद्यांशी सुसंगत असत नाहीत, तेव्हा ते नक्कीच बुमरॅंग सारखे उलटतात आणि निष्फळ ठरतात!


नियमित ध्यानाच्या ठाम सवयीने व सकारात्मक विचारांद्वारे नकारात्मक विचार पु्सून टाकणे, सुरुवातीला कधीच सोपे जाणार नाही. खरेतर कॊणतीहि गोष्ट सुरुवातीला कठिणच असते. तथापि, एकदा सुरुवात केल्यावर निष्फळ विचारांची जागा फलदायी विचारांनी यशस्वीपणे भरली जाउ शकते. हळुहळू पण निश्चितपणे सुखी मनाची अवस्था खात्रीलायकपणे प्राप्त होते.

 


प्रश्न: स्वतः स्वतःची सावधानता चेतना कशी जोपासू शकतो?


उत्तर: सावधानतेची-जागरुकतेची व्याख्या असलेल्या परिस्थितीत, सर्व अंगानी-बाजूनी पूर्ण सचेतन असणे अशी आहे. सावधानता-जाणीव-चेतना हे समानार्थी शब्द आहेत. जाणीव असणे व सचेतन असणे, शुद्ध असणे या वाक्‌प्रचारांचा अर्थ सारखाच आहे.


चेतनेपासूनच आपण सर्व बनलो आहोत. आपण तेच आहोत. तत्‌ त्वम असि श्वेतकेतु! तत्‌ म्हणजे ती चेतना, त्वम म्हणजे तू, असि म्हणजे आहे. याचा अर्थ आपण फक्त हाडे, स्नायू आणि ज्ञानेंद्रिये यांचे बोचके नाही. हे जड शरीर आपण नव्हे. भौतिक शरीराला वापरून स्वतःला व्यक्त करणारी जी चेतना आहे...आपण जाणीव चेतना आहोत. स्वतःला विकसित करा. आतम्याला विकसित करा. स्वतः बरोबर जास्तीत जास्त वेळ रहा. तुमच्या हाडे, स्नायू आणि ज्ञानेंद्रियांबरोबर नाही. जर आपण हाडे, स्नायू आणि ज्ञानेंद्रियांबरोबर जास्त राहिलो तर आपण फक्त त्यांचाच विकास करु. आपल्या चेतनेचा नाही. जर आपण जास्तीत जास्त ’स्व’ बरोबर रहायला सुरुवात करु तसतशी चेतनेची भव्य शोभा, सर्वव्यापी स्वभाव, विपुलता यांची जाणीव आपल्याला होण्यास सुरुवात होईल.

 


प्रश्न: व्यक्तिगत गरजा आणि व्यक्तिगत जबाबदार्‍या यात काय फरक आहे?


उत्तर: मानव आवश्यक अशा दोन गोष्टींचा बनलेला आहे:
एक लहान व्यक्तिगत ’स्व’ आणि एक प्रचंड व्यक्तिभावरहित ’स्व’, आणि माणसाला या दोन्ही ’स्व’ ची काळजी घ्यावी लागते. व्यक्तिगत ’स्व’ ची काळजी घेण्यासाठी माणसाला स्वार्थी असावच लागतं. लहान गरजा, किमान इच्छा, व्यक्तिगत ’स्व’ च्या दुर्लभ सुखसोयी, या व्यक्तिच्या आनंदी अस्तित्वासाठी फार आवश्यक आहेत. कोणतीहि गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि व्यक्तिगत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला खूप कष्ट करावे लागतात. प्रत्येकाने हे सुद्धा समजून घेतले पाहिजे की, आपल्या आजूबाजूला असलेल्या इतरांना त्यांच्या विशिष्ट व्यक्तिगत गरजा पूर्ण करण्यासाठी थोडीफार का होईना पण मदत करणे आवश्यक आहे. हे व्यक्तिगत जबाबदारीच्या प्रकारात येते.


"या लहान जबाबदार्‍याव्यतिरिक्त अधिक मोठ्या जबाबदार्‍या सुद्धा आहेत. अधिक मोठ्या जबाबदार्‍या म्हणजे...संपूर्ण मानवतेसाठी काहींतरी मौल्यवान वाटा उचलणे. प्रत्येकाने किमान एकतरी कला, खेळ, हुनर(हस्तव्यसाय) किंवा ज्ञानाची कोणतीहि शाखा किंवा कोणत्याहि सेवा क्षेत्रात प्रभुत्व मिळवावे आणि ते सर्व समाजाच्या कल्याणासाठी विनामूल्य उपलब्ध करुन द्यावे."


"म्हणून प्रथमतः तीन गोष्टी आहेत":
व्यक्तिगत गरजा
आपल्या अगदी जवळ असलेल्या इतर व्यक्तिंच्या लहान जबाबदार्‍या
संपूर्ण समाजाप्रति असलेल्या अधिकतर जबाबदार्‍या
माणसाने किमान एका विषयात तरी प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. एखादया विषयातील प्रभुत्व ही त्याची त्या समाजाला-मानवतेला दिलेली विशेष भेट-देणगी आहे. कोणत्याहि क्षेत्रात प्रभुत्व कधीकधी संपूर्ण जीवनभर केलेल्या प्रामाणिक समर्पणामुळेच फक्त मिळविले जाते.

 


प्रश्न: पृथ्वीवरील नवयुगाच्या आध्यात्मिक चळवळी (मूव्हमेंट) ची सद्यस्थिती काय आहे?
उत्तर: सर्व अपेक्षांची पूर्तता झाली आहे! ही परिस्थिती आहे! जगातील नवयुगाच्या आध्यात्मिक चळवळीने जगाची मानसिकताच पूर्णपणे बदलली आहे. मानवतेला आधी वाटणारी भीति जवळजवळ नाहिशी झाली आहे.


येऊन ठेपलेला जागतिक सर्वनाश आता अटळ राहिलेला नाही. संपूर्ण विश्वातील हजारो निस्वार्थी आध्यात्मिक गुरुंच्या प्रयत्नांमुळे अत्यंत गौरवपूर्ण फायदे झाले आहेत/होत आहेत. याचा अर्थ असा नव्हे की जगाला इकडे-तिकडे मोठ्या संकटांना सामोरे जावेच लागणार नाही. ते घडणे अटळ आहे. तथापि महत्त्वाचे वळण देणे साध्य झाले आहे.

 


प्रश्न: ज्ञानप्राप्ति होणे म्हणजे स्वतःला देवात विलीन करणेच आहे, असे म्हटले जाते. कृपया स्पष्टीकरण करा.


उत्तर: होय...असं अनेकवेळा म्हटलं जातं की, थेंब महासागरात मिळून जातो, वारंवार असेही म्हणतात की, थेंब संपतो आणि फक्त महासागर रहातो. वेदांच्या मूळग्रंथात तुम्हाला हे अनेकवेळा आढळेल.


भारत अशा प्रकारच्या निरर्थक बडबडीने भरलेला आहे; प्रत्येक हौशी आध्यात्मिक, भारतभर हिंडून, पोपटपंची करून लोकांना ज्ञान देत असतो!


जेव्हा ज्ञान प्राप्ति होते तेव्हा वास्तविक एवढच घडते की, मूर्ख थेंब हा शहाणा थेंब होतो. तो महासागर होत नाही.


त्या मूर्ख थेंबाला वाटते की तो इतरांपासून वेगळा आहे. तथापि शहाण्या थेंबाला माहिती असते आणि खोलवर समजत असते की सतत त्याच्या सभोवताली असलेल्या प्रत्येक गोष्टींबरोबरचा एक अर्क तो नकळत बनला आहे.


ज्ञानप्राप्ति थेंबाला मुळीच विरुप-विद्रुप करत नाही. ज्ञानप्राप्ति कोणत्याही थेंबाची रुपरेषा पुसून टाकत नाही. सीमा नाहीशा होत नाही. ’स्व’ विश्वात किंवा देवात मिळून जात नाही, विलीन होत नाही. ’स्व’ ची अद्वितियता आणि वैशिष्टय नेहमीच, जशाच तसं, अखंड असते.

 


प्रश्न: भावना - मनोविकार यावर आपलं स्पष्टीकरण द्या


उत्तर: दैनंदिन जीवनात मनोविकारांचा विषय हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मनोविकाराची व्याख्या - भावनांतील तीव्रता, उलट प्रतिक्रियेतील प्रखरता, अशी करतात.
’भावनातिशयता’ ही स्वतःच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. ’भावनातिशयता’ म्हणजे पृष्ठभागावर न रहाता आत खोलवर उडी घेणे. ’भावनातिशयता’ म्हणजे इकडे का तिकडे जाऊ अशी भीति वाटून काठावर थांबणे नव्हे. वास्तविक पहाता निश्चित बाजू घेणे असा त्याचा अर्थ आहे.


’भावनातिशयता’-प्रखरता म्हणजे त्वरित निर्णय घेणे, गोष्टीचा पटकन अंदाज घेणे.
’भावनातिशयता’-तीव्रता म्हणजे एखादया गोष्टीला हो म्हणणे व दुसर्‍या गोष्टीला हृदयापासून नाही म्हणणे. दोन भिन्न आतम्यातील - अन्योन्यक्रिया - परस्परक्रिया नेहमीच भावना निर्माण करतात.


भावना हा नैसर्गिक हृदय चमत्कार आहे आणि तीव्र भावना तितक्याच स्वाभाविक आहेत...आणि सर्व सृष्टि आपापल्या परीने प्रखर आहे व हे आश्चर्यकारक आहे.
मानवराज्याचे भावना हे मोठे वैशिष्टय आहे. माणूस म्हणून आपण भावनात-मनोविकारात तज्ञ आहोत.


भावना कधीच दाबून टाकायच्या नसतात. भावनाप्रधान असण्याची कोणीच भीति बाळगायला नको. आपल्या भावनांबद्दल त्याला/तिला कोणालाच अपराधी वाटायला नको. धार्मिक लोक भावनांवर ताबा मिळवायचे समर्थन करतात, हे अगदी मूर्खपणाचे आहे. प्रामाणिकपणा स्वतःच्या भावना मनमोकळेपणाने प्रदर्शित करण्याची मागणी करतो.
अर्धवट बुद्धिचे लोक भावना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. अपरिपक्व बुद्धिच्या लोकांना स्वतःचीच भीति वाटते आणि स्वतः भोवती असलेल्या प्रत्येक गोष्टीची भीति वाटते. तथापि एक पूर्ण विकसित झालेली आध्यात्मिक बुद्धिमत्ता आपल्या भावनांचे लगाम मोकळे सोडते. आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक रहाण्यासाठी, आपल्या भावना मुक्त व खरेपणाने व्यक्त करण्याची अपेक्षा-मागणी करतो. म्हणून आपण भावनांवर ताबा ठेवण्याबद्दल कायमचे विसरून जाऊ या. आपल्या भावनांचा आदर करायला सुरुवात करु या. तथापि, लोकांमध्ये कशाची कमतरता आहे तर ती इतरांच्या भावनांचा आदरपूर्वक विचार न करणे! जेव्हा इतर भावनाप्रधान होतात, तेव्हा अगदी शांत राहून व इतरांना जे जोरदारपणे सांगायचे आहे ते समजून घेण्याची ती वेळ असते.


अत्यंत घृणास्पद व अतिशय तिरस्करणीय कृत्य कोणते असेल तर ते आहे शारीरिक अत्याचार...शरीराला निष्ठूरपणे वागवणे. शारीरिक दुष्ट कृत्ये...भावनांचा उद्रेक नव्हे!
म्हणून शेवटी सुसंस्कृत सन्मान देणे यावर सर्व गोष्टी येऊन ठेपतात. स्वतःमधील तसेच इतरांच्या भावनांचे सौंदर्य व संदर्भ जाणून घ्या. यालाच सध्या, नवयुगातील भावनात्मक आरोग्य म्हणतात.


आजकल बुद्धयांकाला एवढा सन्मान दिला जात नाही. पण भावनात्मक अंक विचारात घेतला जातो.

 


प्रश्न: मृत्यू बद्दल आपली कल्पना काय आहे? मरणानंतर जीवन आहे का?


उत्तर: मृत्यू नाहीच! तुम्ही शरीर नाही! तुम्ही आत्मा आहात!


भगवत्‌गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे. "तुम्ही शरीर नाही, म्हणून तुम्हाला मरण नाही. शरीर जन्म घेते आणि ते मरण पावते."


जन्म घेतलेल्या प्रत्येकाला मरावच लागतं. शरीर हे तुम्ही पाण्यावर काढलेल्या रेषेप्रमाणे आहे. प्रत्यक्षात तशी रेषा नाही. पण जो पर्यंत तुमचे बोट तेथे आहे, तोपर्यंत ती रेषा असते. म्हणून शारिरिक मृत्यू आहे, पण आत्मा मरण पावत नाही. तेव्हा रडण्यात काय अर्थ आहे? आध्यात्मिक शास्त्र रडण्याच्या व दुःख करत बसण्याच्या विरुद्ध आहे.


मृत्यू हा शब्द कधीहि वापरू नका. कारण तेथे मृत्यूच नाही. भौतिक शरीरात प्रवेश करणे व भौतिक शरीर सोडून जाणे असा काहीसा प्रकार आहे.


भौतिक शरीर हे आपल्या वस्त्राप्रमाणे - कपड्यांप्रमाणे आहे. आधी माझ्याकडे हे कपडे नव्हते, आता मी हे कपडे घालत आहे, आणि पुन्हा काही काळानंतर, मी हे कपडे काढून ठेवणार आहे!


त्याचप्रमाणे, तुम्ही तुमची स्वर्गातिल कर्तव्ये सोडून येथे या पृथ्वीवर आला आहात. वास्तविक तुम्ही उच्चतर जगातील नागरिक आहात आणि थोड्या वेळाकरता, काही काळासाठी, तुम्ही या धरणीवर आला आहात. तथापि, थोड्या काळानंतर तुम्ही पुन्हा स्वर्गात परत जाल. ज्याक्षणी तुम्ही परत जाल, तेव्हा तुम्ही तुमची नेहमीची कार्य तेथे सुरु कराल!

 


प्रश्न: सरकार चालविण्याची धुरा राजकारण्यांपासून आध्यात्मिक पुढारी स्वतःकडे घेत आहेत असे तुम्हाला वाटते का?


उत्तर: आध्यात्मिक नेते - फक्त तेच लोक राज्यकारभार चालवू शकतात. कारण ज्या लोकांनी स्वतःवर पूर्ण स्वामित्व मिळवलेले आहे तेच लोकं इतरांना समजू शकतात.
जर तुम्ही इतरांना समजू शकत नाही तर तुम्ही राज्य करु शकत नाही! राज्य करण्यासाठी दोन गोष्टी असायला हव्यात. एक म्हणजे इतरांना समजून घेणे. दुसरी गोष्ट, त्यांच्यापेक्षा तुम्ही उच्च विकास पातळीवर असायलाच हवे. या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.
आध्यात्मिकते मध्ये पुढारलेले लोकच इतरांना समजून घेऊ शकतात. सॉक्रेटिस म्हणाले "फक्त, तत्वज्ञानी लोकांनी राजा व्हायला हवं", जगातील ज्ञानप्राप्त झालेल्या सर्व गुरुंनी एकत्र यायला हवं, म्हणजे आध्यात्मिक गुरुच खर्‍या अर्थाने कल्याणकारी विश्व सरकार स्थापन केलं जाईल.

Go to top