७ चक्र

ब्रह्मर्षी पत्रीजी : सफाळे ध्यान शिबीर १६ मार्च २०१४

 

पहिली पायरी मूलाधार: शरीराचा संबंध

शरीराच्या स्तरावर मानव जे काही करतो त्या सर्व क्रिया  म्हणजेच मूलाधार चक्र!

उदाहरणार्थ : खाणे, पिणे, झोपणे, खेळणे, पोहणे, पळणे, शरीर शौश्ठव व अशाच इतर सर्व क्रिया. शारीरिक पातळीवरचे सर्व खेळ , व्यायाम कामे ..... शरीर  अतिशय महत्वाचे आहे. शरीराची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. शरीर निरोगी असणे हेहि अतिशय महत्वाचे आहे..  फक्त शरीराचाच संबंध असलेल्या सर्व क्रिया मूलाधार ह्या चक्र मध्ये येतात..

असा समाज करून घेऊ नका कि मूलाधार म्हणजे एक चक्र आहे व ते गोल गोल फिरते, त्याची काही मुळाक्षरे आहेत वगैरे, त्याला ३, ४, ८ ....अश्या पाकळ्या आहेत. हे सर्व चुकीच आहे. ह्या समजुतीतून बाहेर या.

 

दुसरी पायरी स्वाधिष्ठान : मानसिक क्रिया , जिथे मनाचा संबंध असतो.

मला जर गावाचा मुखिया किंवा आमदार, खासदार व्हायचे असेल तर ति शारीरिक पातळीवरचे काम नाही. ति मानसिक  पातळीवरची क्रिया आहे. जर मला मुखिया व्हायचे असेल तर मला सर्व गावकऱ्यांची मने जिंकायला हवीत. तरच मी मुखिया होईन. हे मनाचे काम आहे.

 

 

मला बुद्धिबळ खेळायचे आहे तर ते मानसिक स्तरावरचे काम आहे. मला गाणे म्हणायचे आहे, ते हि मानसिक स्तरावरचे काम आहे. ज्या काही मानसिक क्रिया आहेत त्या सर्व स्वाधिष्ठान खाली येतात. इथे शरीराचे काहीहि काम नाही. मी बुद्धिबळ खेळत आहे तर शरीराचे काही काम आहे का? मनाचे काम आहे.

मानसिक काम आहे . फक्त शरीराचाच संबंध असलेल्या सर्व क्रिया मूलाधार खाली येतात. मानसिक स्तरावरच्या सर्व क्रिया स्वष्ठीन खाली येतात.

 

तीन स्तर असतात : शरीर, मन आणि बुद्धी

 असे नाही कि हे ३ वेगवेगळे आहेत. एकमेकात गुंतत असतात

 मूलाधार म्हणजे शरीर,  स्वाधिष्ठान  म्हणजे- मन आणि मणिपूरक म्हणजे बुद्धी

 

तिसरी पायरी  मणिपूरक: मानिपुरक म्हणजे बौद्धिक पातळी

डॉक्टरेट मिळवायची आहे, संशोधन करायचे आहे, हि मानसिक पटली आहे का ? पायलट व्हायचे आहे, गानशास्त्र शिकायचे आहे, गाणे गायचे नाही तर गायनाचा पूर्ण अभ्यास करायचा आहे, ह्या सर्व क्रिया मणिपुरक मध्ये येतात.  बौद्धिक स्तराच्या सर्व क्रिया मणिपुरक खाली येतात.

 

हे सर्व शिकल्यावर, मला मराठी नको, गाणे नको, पोहणे नको, गावाचा मुखिया नको, मला आता काहीहि  नको. मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचे आहे. मी पंडित आहे, मुखिया झालो, मला गाता पण येते पण आता मला हे सर्व काही नको. मी कोण आहे ते जाणून घ्यायचे आहे. जिथे चालला आहे तिथून एक यु टर्न घायचा आहे व स्वतः कडे यायचे आहे. म्हणजेच परतीचा प्रवास. म्हणजेच दुनियादारीत त्यांनी सर्व काही बघितले आहे व अनुभवून झाले आहे. दुनिदारीत पहिली पायरी आहे मूलाधार, दुसरी स्वाधिष्ठान व तिसरी व शेवटची पायरी मणिपुरक.

 

मी कोण आहे? मी कुठून आलो आहे? मी का आलो आहे? आत्मा म्हणजे काय आहे? परमात्मा म्हणजे काय आहे ? हे काय लफडे आहे? जेंव्हा तूम्ही परत येत असता तेंव्हा तूम्ही दुनियादारी सोडता व दिनदारी मध्ये प्रवेश करता. जेंव्हा तूम्ही यु टर्न घेता तेंव्हा तूम्ही दुनियादारी सोडता व तूम्ही दिनदारी मध्ये प्रवेश करता.

 

दिनदारी मध्ये पहिली पायरी आहे अनाहत : मौन ठेवणे, गप्प बसणे, तुला काय माहित आहे? काही माहित नाही तुला. गप्प बसावे. बोलणे बंद कर. अंतर्मुख होऊन चिंतन कर.

मणिपुरक मध्ये आपण पंडित बनतो, अनाहत मध्ये आपण गुरु बनतो. पंडित म्हणजे विल्लीयम शेक्सपिअर,पंडित जसराज इत्यादी. इथे तूम्ही गुरु बनता. अनाहत चक्रामध्ये तूम्ही नाविन कर्म करणे बंद करता.

दिनदारी मध्ये दुसरी पायरी आहे विशुद्ध:  

विशुद्ध चक्र: विशुद्ध माध्ये शुद्धीकरण होते, विशेष रूपात शुद्धीकरण होते. वाईट बोलत नाही , वाईट विचार करत नाही, शांत राहतो व चिंतनात असतो. 

 ज्याने मांस खाल्ले आहे, कोणाचे खून केले आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मानिपुरक मध्ये जे काही वाईट काम केले आहे त्या सर्व कर्मांचे पूर्ण शुद्धीकरण इथे होते.

दुनियादारीत जर त्रास दिला असेल तर दिनदारीत त्रास भोगावा लागतो. जो पर्यंत सर्व कर्म फेडली जात नाहीत तो पर्यंत आज्ञा चक्रात जाता येत नाही. विशुद्ध चक्रा मध्ये सर्वे मागच्या जन्मीची कर्म फेडली जातात.  

ज्याने मागचे जन्म बघितले आहेत तो आज्ञा चक्रामध्ये जातो.

 

अनाहत म्हणजे अध्यात्मिक शास्त्र

विशुद्ध म्हणजे अध्यात्मिक ज्ञान

आज्ञा म्हणजे अध्यात्मिक अनुभव (मागचा जन्म बघणे)

 

भग्वद्गीतेतला एक श्लोक:

बहूनि मे व्यतीतानि जन्मनि तव चार्जुन l

तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेथ्त् परंतप ll

श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात कि हे अर्जुन मी आणि तू अनेक जन्म घेतले आहेत. मला ते सगळे जन्म आठवत आहेत, तुझे जन्म व माझे हि जन्म, पण तू मात्र सगळे जन्म विसरला आहेस.

 

दुनियादारीत आहेत ते सर्व नर आहेत . त्यात तीन पायऱ्या आहेत:-  नर कनिष्ट ,नर मध्यम व नर श्रेष्ठ. जे परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत, जे दिनदारीत आहेत ते नारायण आहेत.

त्यातहि  तीन पायऱ्या आहेत नारायण कनिष्ट, नारायण मध्यम व नारायण श्रेष्ठ.

आपण आधि नर बनतो व नंतर नारायण होतो. (नराचा नारायण होणे)

अर्जुन नर होता आणि श्रीकृष्ण नारायण श्रेष्ठ .

 

प्रत्येक आत्म्याला पाहिले नर व्हायचे आहे , नर श्रेष्ठ व्हायचे आहे मग नारायण व्हायचे आहे व नारायण श्रेष्ठ व्हायचे आहे.

जो नारायण श्रेष्ठ झाला तोच गुरु होउ शक्तो .

 

मूलाधार म्हणजेच प्रापंचिक शारीरिक स्तर कार्य , स्वाधिष्ठान म्हणजे प्रापंचिक मानसिक स्तर कार्य , मणिपुरक म्हणजे प्रापंचिक बौद्धिक स्तर कार्य, अनाहत म्हणजे प्रापंचिक अध्यात्मिक शास्त्र !

 

ह्यालाच अध्यात्मिक शास्त्र असे म्हणतात.

प्रापंचिक गोष्टी नकोशा वाटतात व अध्यात्मिक गोष्टी समजत नाहीत.  हे सर्व अध्यात्मिक शास्त्र आहे. आपण जेंव्हा आज्ञा चक्रात येतो तेंव्हाच काहीतरी समजायला लागते. जेंव्हा गुरु बनतो तेंव्हा दुनियादारी जाणली, दिनदारी जाणली असे म्हणायला हरकत नाही. आपल्या स्वतः बद्दल सर्व माहिती मिळाली, कि मी एक आत्मा आहे, मी अनेक अनेक जन्म घेतले आहेत, पहिले मूलाधार मध्ये राहत होतो, मग स्वाधिष्ठान मध्ये गेलो, मग मणिपूरक मध्ये राहत होतो ,मग अनाहत मध्ये आलो मग विशुद्ध मध्ये व अज्ञा मध्ये येऊन आज्ञा चक्र पण पूर्ण केले. सर्व अध्यात्मिक शिक्षण पूर्ण केले. जो पर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही तो पर्यंत जाणे येणे चालूच राहते (पुनरपि जननम, पुनरपि मरणं). जेंव्हा आपला अभ्यास पूर्ण होतो ,जेंव्हा सर्व चक्र कार्यान्वित होतात ,तेंव्हा यायची गरज नसते .पण शिक्षण पूर्ण करून सुद्धा जे परत येतात त्यांना अवतार असे म्हणतात. हसत हसत, लोक कल्याणासाठी जे परत जन्म घेतात त्यांना अवतार असे म्हणतात.

अवतार मेहेर बाबा, भगवान रमणा महर्षी,  भगवान ओशो अशी अनेक उद्धरणे आहेत. त्यावेळेला भगवान हा शब्द प्रचलित होता. आत्ताच्या नवीन युगात अश्याच लोकांना अध्यात्मिक शास्त्रज्ञ असे म्हणतात. इथे जमलेले सर्व लोक अध्यात्मिक शास्त्रज्ञ आहेत.

 

सहस्त्रार म्हणजे सहस्त्र पाकळ्या असलेले कमळ .म्हणजेच सहस्त्र विविध कार्ये. जितक्या लोकांना ध्यान शिकवले तितक्या पाकळ्या , १०० लोकं १०० पाकळ्या १००० लोकं १००० पाकळ्या . ह्या प्रमाणात प्रत्यकाने आपल्या पाकळ्या मोजाव्यात!

 

मूलाधार, स्वाधिष्ठान , मणिपूरक म्हणजे व्यक्तिमत्व विकास ! नर ....प्रापंचिकता .........

अनाहत , विशुद्ध , आज्ञा म्हणजे अध्यात्मिकता विकास....! नारायण ......अध्यात्मिकता ....

 

भगवत गीता हि नर व नारायणाची गोष्ट आहे.

चक्र ह्या नावाचा अर्थ “ चाकासारखे “ नसून ते  जगण्याचे “सिद्धांत “ आहेत असा विचार करा.

 

मूलाधार म्हणजे शारीरिक स्तर , स्वाधिष्ठान म्हणजे मानसिक स्तर , मणिपूरक म्हणजे बौद्धिक स्तर, अनाहत म्हणजे शांतता वा अंतर्मुख होणे, विशुद्ध म्हणजे सर्व कर्म शुद्धी!

 

विशुद्धी मध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नाही , कारण कर्म भोग भोगायचे आहते हे माहित आहे. त्या मुळे तक्रार नाही, खटले नाहीत, न्याय निवाडा नाही, जे जसे आहे ते मान्य आहे. हि सर्व विधाने अनाहत व विशुद्ध मधून केली आहेत.

 

ह्या सिद्धांताला star concept असे म्हणतात.

s=surrender= समर्पण

t=trust= विश्वास

a=allow=  अनुमती देणे

र= receive = स्वीकारणे

 

अहमदाबाद मध्ये माझी एक अत्त्या आहे. तिच्या नवर्याने खूप पैसे कमावले व सर्व गमावले पण. ती एकटीच सगळी कामे करायची.२० वर्षे फक्त भोगच चालू होते. मग नवरा गेला, मग पहिला मुलगा गेला मग दुसरा व नंतर मुलगी लग्न करून गेली व हि एकटीच राहिली.त्या दिवसात मी नवीनच ध्यानात आलो होतो. मला तिने विचारले कि असे का? माझ्या वाट्याला का इतके भोग आहेत? मग मी तिला संगीतले कि १०० जन्मांचे भोग एकाच जन्मात भोगून सर्व संपून टाकायचा आहेत म्हणून असे जीवन आहे! हे ऐकल्यावर हसून ति म्हणाली हो का ? ठीक आहे! परत आपल्या कामाला लागली! काहीच तक्रार नाही.....!  पूर्ण विशुद्धी झाली आत्म्याची. सर्व कर्मांची शुद्धी झाली , व ह्या जन्मी एक great master म्हणून ति जन्माला आली आहे व आत्ता २० वर्षांची आहे. एक गुरु म्हणून जन्माला आली आहे ती !  

 

सर्व पिरामिड मास्टर्स सहस्त्रार पातळीवर आहेत. ते सर्व जण स्वतःसाठी आले नाहीत तर ते दुसऱ्यांसाठी, लोककल्याणासाठी आले आहेत . लोकांना ध्यान व अध्यात्मिक शास्त्र शिकवण्यासाठी आले आहेत.........

Go to top