"मूल चैतन्य - २"

 

निर्माणाच्या जाणीवेचा मुलभूत आधार आहे " तो एक"

जरी त्याचे रुपांतर "दोन"मध्ये होत असले तरीही

त्याचा अंत कधीही "एक" नसतो;किती हा विरोधाभास!

अनादी काळ एक आणि फक्त एकाच असतांना ;

त्याचे रुपांतर एकप्रकारे दोन मध्ये होते...

"प्रकृती" आणि "पुरुष"

"अद्वैत" उत्पन्न करते "द्वैत" ला

"ते एक" उरते "दोन" च्या बाजूला

"अद्वैत" तसेच अखंड राहते ,"द्वैत" असूनही.

आणि "ते दोन" बदलत राहतात अनेक प्रकारच्या संयोग/रचना आणि पुनःसंयोगाने...

उत्पन्न करत राहतात वेगवेगळ्या नमुन्यांच्या सृष्टी....

"जीवन" कंप पावते आणि लक्षावधी मार्गांनी कार्यवाही होत राहते....

अगणित अश्या अयामांमध्ये!

"मूल चैतन्यालाच" म्हटले जाते,"निर्गुण परब्रह्म"

"सृष्टी" हे "सगुण परब्रह्म".

Go to top