"तर्कशास्त्र"

 

तर्कशास्त्राचे दोन प्रवाह आहेत

एक पूर्णतः आधारित आहे ; "ह्या बाजूवर",

म्हणजेच ,आधारित आहे मनावर.

दुसरा आधारित आहे ...

"ही बाजू + दुसरी बाजू"

म्हणजेच, आधारित आहे...

मन + आत्मा + स्व

"मन" एकत्रित परिपाक आहे,

पडद्याच्या ह्या बाजूच्या अनुभवांचा.

"आत्मा" ,अनादी व्यक्तिगत सत्य.

"स्व", आधार/पाया आहे ...

"त्या सर्व काही" चा.

"स्व"आहे "मूल चैतन्य"

मनावर आधारित "तर्क",

द्विधा , गोंधळ ,त्रास , नैराश्य , युद्ध ,क्रूरता वगैरे...

याकडे घेऊन जातो.

मन + आत्मा + स्व वर आधारित "तर्क"

एकोपा ,आनंद , सर्जनशीलता ,कल्याण ,

मृदुता , मैत्रीपूर्ण सद्भाव याकडे घेऊन जातो.

"तर्क -२" ला निवडा!

Go to top