"दुसरी बाजु"

 

आत्मे दुसया बाजुने (पलीकडून) येतात.

विशेषतः आत्मे ,जे मनुष्य देहात असतात.

 

हे जेंव्हा समजेल , त्यावेळी मानवता विकसित (matured)  होईल.

जोपर्यंत ,हे जाणले जाणार नाही , तोपर्यंत ,

मानवता बाळबोध किंवा लहान किंवा अविकसित (immature)

समजली जाईल.

 

अविकसित मानवतेचे स्वःताचे असे दोष आहेत...

निराशा,भय, नकारात्मक भावना , चिंता आणि सर्व प्रकारचे

मानसिक आजार , रोग , दुःख.

 

आध्यात्मिकता हा शोध आहे सत्याचा , सर्व अविकसित मानवतेसाठी,

की आपण पलीकडून /दुसऱ्या बाजूने आलो आहोत.

 

ज्ञानी मानवता पलीकडल्या बाजूबद्दल सगळे काही जाणते.

त्यामुळे त्यांना नैराश्य ,भीती नसते, फक्त सकारात्मक भावना ,

सदैव परम आनंदात ...आणि कोणत्याही प्रकारची मानसिक व्याधी,

आजार, दुःख नसतात.

Go to top