"असमाधान -४"

 

आत्मा अनंत /अनादी आहे

म्हणून , दिवस , जन्म मोजणे थांबवा !

आत्मा सदैव आहे

म्हणून घाई जाऊ द्या

म्हणून काळजी जाऊ द्या 

आत्मा आहे संपूर्ण उर्जा 

म्हणून आपल्या स्वतःच्या उर्जेचा शोध घ्या!

जेंव्हा आपण ध्यान करतो ; 

तेंव्हा आपण आपली ऊर्जाशक्ती वाढवतो.

आपण आपली जागरुकता वाढवतो.

आपण आपले सत्याचे आकलन वाढवतो.

 

आत्मा संकटात आणि दुःखात पडलेला असतो...

कमी ऊर्जाशक्ती आणि कमी जागरुकता ;यामुळे !

"ध्यान"....

मार्ग आहे, सर्व संकटातून आणि दुःखातून बाहेर येण्याचा....

बुद्धत्व किंवा निर्वाण...,

म्हणजे अजून अधिक त्रास नाही 

म्हणजे अजून अधिक दुःख नाही 

म्हणजे अजून अधिक संकटात पडणे नाही

म्हणजे अजून अधिक त्रासात पडणे नाही

म्हणजे सर्वाना ध्यान शिकवणे,सदासर्वकाळ, सर्व परिस्थितीत

तरीसुद्धा , असमाधान कायम राहिलाच !

तीच एका बुद्धाची जागरुकता आहे.

Go to top