"असमाधान - २"

 

आत्म्याचा मुलभूत स्वभाव आहे "असमाधान" 

किंवा "समाधानाची कमतरता" 

त्यामुळे आत्मा सदैव शोधात असतो....

समाधानाच्या , तृप्तीच्या...

पण , तो कधीही तृप्त होत नाही !

ती स्थिती कधीही प्राप्त होऊ शकत नाही !

परंतु , ह्या सत्याचे ज्यावेळी पूर्णपणे आकलन होते ,

चिंतनातून , ध्यानातून ,...,

एका विरोधाभासी समाधानाचा उदय होतो !

ती निर्वाणाची स्थिती आहे , कोणत्याही दुःखाच्या अभावाची स्थिती !

समाधान अशक्य आहे , परंतु , दुःखाची गरज नाही !

जसजसा, आत्म्याचा मूळ स्वभाव कळत जातो ,

आपण स्वःतावर लादलेल्या दुःखातून बाहेर येतो.

तेच बुद्धत्व आहे !

Go to top