"असमाधान"

 

आत्म्याचा मुलभूत स्वभाव आहे "असमाधान" ....

कारण मूलतः आत्मा म्हणजे "रिक्तता / पोकळी", असे बुद्धाने जाणले !

आणि त्याच्या आधी आणि नंतरच्या इतर अनेक बुद्धांनी जाणले.

म्हणूनच,आत्मा शोधत असतो सर्व प्रकारचे समाधान...

शारीरिक / भावनिक / बौद्धिक / सामाजिक / 

आध्यत्मिक / अहंकार वाढविणारे....

आत्म्यासाठी ,

प्रत्येक छोटा आनंद महत्वाचा असतो....

प्रत्येक छोटा सूर्योदय/प्रकाश महत्वाचा असतो....

प्रत्येक छोटे भावस्पंदन महत्वाचे असते....

प्रत्येक छोटी ज्ञानानुभूती महत्वाची असते....

प्रत्येक छोटा चमत्कार महत्वाचा असतो....

हे आत्मा ! तु काय गोष्ट आहेस !

Go to top