"सत्यम् - शिवम् - सुन्दरम्"

 

आत्मा शोधतो , "सत्यम्"  किंवा "सत्य"

आत्मा शोधतो , "सुन्दरम्" किंवा "सुंदरता"

"शिवम्" येते "सत्यम्" पासून,

जीथे "असत्यम्" आहे तिथे फक्त "अशिवम्" असते.

म्हणजेच, तिथे नसतो  "निरोगीपणा"

तिथे नसते "कल्याण"

तिथे  नसते "आरोग्य"

तिथे नसतो "चांगुलपणा"

"अशिवम्" चा उगम होतो असत्यामधून

"शिवम्" चा उगम होतो सत्यामधून

आत्मा उद्दात्त सत्य आहे

आत्मा ज्यावेळी आत वळतो, 

त्यावेळी "शिवम्" ची निर्मिती होते.

आणि ते "शिवम्" खुप खुप "सुन्दरम्" आहे.

Go to top