"आत्मा"

 

आत्मा कण आहे , E-C-N चा.... जीथे, 

E = Energy(चैतन्य/उर्जा)

C = Consciousness (जाणीव)

W = Wisdom (ज्ञान)

आत्मा ,असीम चैतन्य आहे...

आत्मा, शुद्ध जाणीव आहे....

          शुद्ध जागृती आहे....

          शुद्ध उत्सुकता आहे....

 

आत्मा सदैव अनुभवांच्या शोधात असतो.

निसर्ग किंवा प्रकृती ही जागा/रंगभूमी आहे;

जीथे आत्मा अनुभवांना शोधतो.

आत्मा उल्हासित होतो, सर्व प्रकारच्या अनुभूती घेतांना.

प्रत्येक अनुभव, संबंधित भाव/भावना निर्माण करतो.

आत्मा, त्याच्या अनंत काळात खूप आतुर असतो;

सदैव विभिन्न भाव/भावनांच्या अनुभूती घेण्यासाठी.

 

आत्मा तीन शरीरे धारण करतो,

भौतिक वास्तवात(जगात) प्रवेश करण्यासाठी....

१.कारण शरीर (causal body)

२.दैवी शरीर (astral body)

३.भौतिक शरीर (physical body)

प्रत्येक अनुभव आत्म्याच्या ज्ञानात भर टाकतो.

संग्रहित ज्ञानाचा परिपाक विवेक बुद्धीत  होतो...

आध्यात्मिकता हा आत्म्याचा शास्त्राचा (आत्मविज्ञानाचा)

अभ्यास आहे.

Go to top