"आपण आत्मा आहोत" 

 

"आध्यात्म" अगदीच सरळ सोपा आहे!

फक्त स्वतःचा "आत्मस्वरूप" म्हणून स्वीकार करावा लागतो!

 

आध्यात्माचा भौतिक शरिराशी काहीएक संबध नाही....

भौतिक शरिराने कोणतेही पूजा विधी करण्याची गरज नाही.;

तर;

आध्यात्मात ,मनाचे विधी करावे लागतात......

आध्यात्म हा संपूर्णतः मनाभिमुख विषय आहे.

 

आध्यात्मात मनाला असे वळण लावले जाते की;

आपण स्वतःला आत्मा म्हणून जाणू शकू.

 

"आध्यात्मिक मास्टर्स" ते आहेत ;

ज्यांनी स्वःताला असे तयार केले आहे की,

ते स्वःताला आत्मस्वरूप म्हणुन बघतात.....

२४ तास/३६५ दिवस......!!!

 

"आध्यात्मिक मास्टर्स"  हे सामान्यच लोकं आहेत.....

परंतु,या पृथ्वीवर त्यांचा प्रवास करत असतांना;

त्यांना संपूर्ण जाणिव आहे ;

ते आत्मस्वरूप आहेत याची.

 

आध्यात्मिकता परिपूर्ण आनंद देते!

आनंदी मन म्हणजेच शरीराचे स्वास्य्थ ! 

Go to top