"बीज देवता - वृक्ष देवता"

 

सर्व अस्तित्व हे बीज -देवता आहेत.

आणि जेंव्हा तुम्ही ते अस्तित्व (BEING) बनता;

त्यावेळी तुम्हाला वृक्ष देवता बनावे लागते .

लहान अक्षरे (small letters)  मोठी अक्षरे (capital letters) बनतात .

अर्भक आत्म्यापासून.....असीम आत्म्यापर्यंत .....

असा आत्म्याचा भव्य प्रवास असतो .

प्रवास भव्य असतो प्रगतीच्या प्रत्येक पडावावर !

जसे....

नवजात बालक ....सुंदर आणि अतिशय लाघवी...!

रांगणारे बालक.....सुंदर आणि विस्मयकारक...!

एक बालक ... सुंदर ...!

किशोरवयीन बालक .....आकर्षक... !

एक प्रौढ .... उत्कृष्ट ...!

एक वयस्क ....शांत /कोमल ...!

आणि वृक्ष देवता बद्दल अजून किती सांगावे .... !

Go to top