"व्हेलेंटाईन डे"

 

आज "प्रेमाचा दिवस "

प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस असावा.

आज "प्रणयाचा दिवस"

प्रत्येक दिवस हा प्रणयाचा दिवस/अद्भुतरम्य अनुभूतींचा दिवस असावा.

प्रणय ! प्रणय ! प्रणय !

जीवन हे परस्पर सौहार्द , प्रणय आणि प्रेमासाठी बनले आहे.....

मानवी जीवनाचा  हेतू एका प्रेमातून दुसऱ्या प्रेमात  ......

एका प्रणयातून दुसऱ्या प्रणयात .....

रुपांतरीत होत राहणे आहे.

प्रत्येक जीवनकालात .....शारीरक प्रेमाचे रुपांतर आत्मिक;

प्रत्येक क्षणाला  .... ताराकाशारीरातून कारण शरीरात ....

आणि या अनादी क्षणातून  सर्व कालातीत .... 

असे सतत रूपांतरण होणे.....

या सर्वच उद्देश व्हेलेंटाईन (प्रेमस्वरूप) बनणे आहे.

आध्यात्मिकता म्हणजे ,

व्हेलेंटाईन (प्रेमस्वरूप) बनणे.

सदैव  व्हेलेंटाईन(प्रेमस्वरूप) बनून राहणे.

सर्वप्रथम आपण स्वतःला प्रेम केले पाहिजे!

आपण आपल्याच कौतुकात / प्रेमात पडले पाहिजे !

सर्व "व्हेलेंटाईन्सला" शुभेच्छा !!!

Go to top