"समाधान-२"
समाधान आत्म्याचा देव आहे.
आत्म्याचा उद्देश काय आहे ?
मौज करणे ! मौज करणे !
मौज करणे ! मौज करणे !!
समाधान मिळते......,
गरजा आणि इच्छा
यांची काळजी घेतल्याने ,
त्यांची पूर्तता केल्याने
असमाधान चालू राहते....,
गरजा आणि इच्छा ;
यांची पूर्ती न झाल्याने.
परंतु ,गरजा आणि इच्छा
पुर्ण करण्यासाठी प्रयत्न
करावे लागतात.
योग्य प्रयत्नांनी स्वतःच्या गरजा /इच्छा
आणि इतरांच्या गरजा / इच्छा यांची
एकाचवेळी पूर्तता होते.
तरीसुद्धा, योग्य प्रयत्न
असूनही , असमाधान चालूच राहते.
कारण तेच मुलभूत सत्य आहे !
याची जाणिव झाल्यानेच ,
आध्यात्मिक समाधानाचा उदय होतो !