अनुभवाचे सार

सर्वांनी ज्ञानी बनण्याची वेळ आलेली आहे
प्रत्येक आत्म्याने ज्ञान ग्रहण करण्याची वेळ आलेली आहे
ज्ञान हे विश्वाचे महान चलन आहे
जास्त ज्ञान म्हणजे ... तुम्ही श्रीमंत अस्तित्व आहात

* * *
ज्ञान हे अनुभवांतून कोळून काढलेले सार आहे
जितके आपण अनुभव टाळू, तितके आपण ज्ञानापासून दूर जाऊ.

* * *
पृथ्वीवरिल अनुभव हा कुठल्याही आत्म्यासाठी ज्ञानाचा संपन्न स्त्रोत आहे,
कुठल्याही आत्म्याला पृथ्वीवर किंवा स्वर्गात ’पराभव’ अथवा ’विजय’ नाही.
प्रत्येक अनुभव हा आपल्या एकूण ज्ञानाच्या रचनेमधे भर टाकत असतो.

* * *
अज्ञानी लोक अनुभवांना घाबरतात
ज्ञानोदय झालेले लोक जास्तीत जास्त अनुभव शोधतात
म्हणून, साक्षात्कारी लोक विलक्षण वेगाने ज्ञान गोळा करतात

 

-ब्रह्मर्षि पत्रीजी
-स्पिरिच्युअल इंडिया नोव्हें. डिसें. २००६, पान ४४ मधून संकलित

Go to top