ब्रह्मर्षि पत्रीजी

 

      सुभाष पत्री यांचा जन्म ११/११/१९४७ ला आंध्रप्रदेशातील निझामाबाद जिल्ह्यातील शक्करनगर इथे झाला. त्यांच्या वडीलांचे नांव पी. व्ही. रमणराव आणि आईचे नांव सावित्रीदेवी होते.

 

      त्यांचे शालेय शिक्षण बोधन गावी व सिकंदराबाद शहरात व कॉलेज शिक्षण हैद्राबाद शहरात पूर्ण झाले.

 

      १९७४ साली आंध्र प्रदेशात शेतकी विद्यापीठात भूशास्त्राचे पदव्युत्तर (एम्.एस्.सी.) शिक्षण संपादन केल्यावर १९७५ मध्ये कोरोमंडल फर्टिलायझर या बहुराष्ट्रीय खत कंपनीत नेमणूक स्वीकारली.

 

      पत्रीजींनी स्वर्णमाला यांच्याशी विवाह केला. त्यांना परिणिथा व परिमला ही कन्यारत्ने झाली. १९७४ मध्ये त्यांचे गुरू हिमालयातील १६० वर्षे वयाचे योगी सदानंद यांच्या सेवेत ते शेवटची 3 वर्षे होते. एक वर्ष मौन व्रत पाळले.

 

"ज्ञानोदय"

      पत्रीजींना १९७९ साली नोकरीत असतानाच आत्मज्ञान प्राप्ती झाली. अनेक आश्रम, मशिदी व मठांना भेटी दिल्यावर खर्‍या आध्यात्म ज्ञानाबद्दल लोकांम्ध्ये प्रचंड अज्ञान व भ्रामक धर्मबध्द कल्पना असल्याचे लक्षात येऊन सर्वांना ध्यानात आणण्यासाठी त्यांनी "ध्यान जगत‌" हा संकल्प केला. त्यासाठी पत्रीजींनी ध्यानाबाबत काही महत्वाचे प्रयोग केले. त्यात पिरामिड उर्जा व ध्यान किती वेळ करावे याचा समावेश होता. प्रत्येक व्यक्तीला ज्ञान प्राप्तीसाठी जागृत करण्यासाठी अतिशय जोरदार प्रयत्न पत्रीजींनी सुरू केले. त्यापुढील १० वर्षात त्यांनी अध्यात्म शास्त्र व ध्यान शास्त्र यावरील जगभरातील मास्टर्सनी लिहीलेल्या 50,000 हून अधिक पुस्तकांचे वाचन केले.

 

"आध्यात्मिक मूव्हमेंट"

      ध्यानशास्त्राविषयी व सर्वांना शारिरीक, मानसिक व बौध्दिक आरोग्य पुरविण्यासाठी आणि सगळयांचे कल्याण होण्याबाबत ध्यानाच्या महत्वाच्या भूमिकेबद्दल प्रत्येकाला तीव्र जाणीव करून देण्याचे ध्येय समोर ठेवून पत्रीजींनी कर्नुलमध्ये ‘दि कर्नुल स्पिरीच्युअल सोसायटी‘ ची स्थापना १९९० साली केली.

 

"पिरामिड ध्यान"

      पिरामिड मध्ये केलेले ध्यान तिप्पट बलवान असते. पत्रीजींनी संपूर्ण जगातील जनतेपर्यंत प्रथमच पिरामिड ध्यान पोहोचविले. १९९१ मध्ये पत्रीजींनी पहिला बुध्द पिरामिड कर्नुलमध्ये स्थापन केला. १९९६ मध्ये उरवकोंडा येथे दुसरा पिरामिड बांधला गेला. त्या पाठोपाठ संपूर्ण आंध्रप्रदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतात अनेक लहान मोठे पिरामिड स्थापन झाले व होत आहेत. बंगलोर जवळील मैत्रेय बुध्द पिरामिड मध्ये एकावेळी 5000 लोक ध्यान करू शकतात.

 

"नोकरीचा राजीनामा"

      १९९२ साली पत्रीजींनी आपल्या उच्च पदस्थ नोकरीचा राजीनामा देऊन संपूर्ण मानव जातीची अखंड सेवा करणे सुरू केले. १९९२ पासूनच्या पत्रीजींच्या समर्पित प्रयत्नामुळे भारतभर शेकडो पिरामिड स्पिरीच्युअल सोसायटीज स्थापन झाल्या आहेत. देश विदेशातही त्यांचे जाळे पसरले आहे.

 

"आध्यात्मिक शास्त्र साहित्य"

      नवयुगाच्या आध्यात्म शास्त्र विषयावर पत्रीजींनी 200 च्या वर पुस्तके लिहीली आहेत व अनेक सी.डी. केल्या आहेत. त्यांचे बहुतांश साहित्य तेलगू भाषेत आहे. आध्यात्मिक साहित्य इंग्रजी, हिंदी व सर्व प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करायला ते उत्तेजन, मार्गदर्शन देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील महान आध्यात्मिक गुरूंची पुस्तके तेलगू, कन्नड, हिंदी, तामिळ, मराठी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये येत आहेत.

 

"ब्रह्मर्षि"

      १९९७ मध्ये आंध्रप्रदेशातील प्रसिध्द तिरूपती देवस्थानात पत्रीजींना बह्मर्षि पद देण्यात आले. पत्रीजी देशाच्या कानाकोपर्‍यात दुरवरच्या खेडेगावात सुध्दा जाऊन सर्व वयोगटातील, सर्व थरातील लोकांसाठी ध्यान वर्ग घेतात. आनापानसति ध्यान, शाकाहार व नवयुगाचे आध्यात्मशास्त्र यावर हजारो कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत.

 

"संगीत आणि ध्यान"

      पत्रीजी उत्तम बासरीवादक आणि गायक सुध्दा आहेत. अतिशय तीव्र ध्यानाच्या अनुभवासाठी ध्यानाबरोबर संगीताचा वापर करण्याचे तंत्र त्यांनी उपयोगात आणले.

 

"पौर्णिमा उर्जा"

      निसर्गाबरोबर राहण्याच्या संकल्पनेचा पत्रीजी पुरस्कार करतात. घनदाट जंगलात समूहाने जाऊन ध्यान करण्याच्या मोहिमेला ते उत्तेजन देतात आणि विशेषत: पौर्णिमेला रात्रभर ध्यान करण्यास व पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यास ते आग्रहाने सांगतात.

 

"लाईफ टाईम अचिव्हमेंट"

      नोव्हेंबर २००६ मध्ये आरोग्यधाम मार्फत महात्मा गांधी इंस्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम, वर्धा येथे आयोजित केलेल्या परिपूर्ण जीवनाचे शास्त्र आणि जागतिक स्तरावर त्याचा वापर या विषयावरील राष्ट्रीय चर्चा सत्रात पत्रीजींचा लाईफ टाईम अचिव्हमेंट हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

"ध्यान जगत 2012 पर्यंत"

      २०१२ सालापर्यंत ध्यान जगत निर्माण करण्याचे पत्रीजींचे स्वप्न आहे. संपूर्ण जगाने ध्यान शास्त्राचा - आनापानसतिचा स्वीकार करण्याची वेळ आलेली आहे. संपूर्ण पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट त्यासाठी कामाला लागली आहे. जागतिक स्तरावर आरोग्य व विश्व कल्याणासाठी आनापानसति ध्यान व शाकाहार या मुलभूत गोष्टी आहेत अशी शिकवण पत्रीजी देतात.

Go to top